मुंबई : आयपीएलचा IPL 2020 यंदाचा हंगाम सुरु झाल्यापासूनच त्यातील प्रत्येक सामन्यातून अनेक क्षण क्रीडारसिकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहेत फक्त सामनेच नव्हे, तर सराव शिबिरांदरम्यानच्या क्षणांवरही सर्वांच्याच नजरा आहेत. खऱ्या अर्थानं क्रीजा आणि मनोरंजनाची सांगड घालणाऱ्या या क्रिकेटच्या महासंग्रामात मुंबईच्या संघाची दमदार कामगिरी पाहायला मिळत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुणतालिकेत अग्रस्थानी असणाऱ्या या संघातील हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या ही भावांची जोडीसुद्धा यंदा चांगली कामगिरी करताना दिसत आहे. पण, काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या दिल्लीविरुद्धच्या सामन्यात मात्र या दोन्ही भावांची एक वेगळीच बाजू पाहायला मिळाली. 


मुंबईनं हा सामना ५ गडी राखून जिंकला. पण, त्यादरम्यानच कृणाल पांड्या मात्र काहीसा संतापलेलाही दिसला. हार्दिकवर कृणालचं संतापणं तेसुद्धा हार्दिकच्या वाढदिवसाच्याच दिवशी हे अनेकांना धक्का देणारं होतं. दिल्लीविरोधात खेळल्या गेलेल्या सामन्यात कृणालनं चांगली कामगिरी करत २६ धावा देत २ गडी बाद केले होते. पण, फलंदाजीच्या बाबतीत त्याचा भाऊ हार्दिक मात्र अपयशी ठरला. 


मुख्य म्हणजे संघाकडे गोलंदाजीची फळी असताना क्षेत्ररक्षणासाठी मैदानात असणारा हार्दिक तेथेही चांगलं प्रदर्शन करु शकला नाही. मिसफील्ड होताच गोलंदाजी करणारा कृणाल हार्दिकच्या रोखानं जोरात ओरडला. हार्दिकनं एक ओव्हरथ्रो केल्यामुळं विरोधी संघातील खेळाडूला धावबाद करण्याची संधी गमवावी लागली होती. त्यामुळं कृणालचा पारा चढला. 



कालांतरानं तो क्षण विरुन गेला. पण, सोशल मीडियावर मात्र याची बरीच चर्चा झाली. किंबहुना काही व्हिडिओसुद्धा व्हायरल झाले. ज्यामध्ये पांड्याबंधुमध्ये उडालेला हा खटका पाहायला मिळाला.