IPL 2020, Qualifier 1 : अतिशय लाजीरवाणा विक्रम रोहित शर्माच्या नावे
४ वेळा गोल्डन डकवर रोहित बाद -
मुंबई : Mumbai vs Delhi च्या Qualifier 1 चा सामना आज रंगला. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा 'गोल्डन डक' चा शिकार झाला आहे. रोहित आपल्या ओव्हरच्या पहिल्याच चेंडूत स्पिनर अश्विनचा शिकार बनला. एलबी डब्ल्यू आऊट होऊन रोहित शर्मा पवेलियनमध्ये परतला.
रोहित शर्मा आतापर्यंत एक दोन नव्हे तब्बल १३ वेळा एकही धावा न करता आऊट झाला आहे. असं करून रोहितने हरभजन सिंह आणि पार्थिव पटेलची बरोबरी केली. भज्जी आणि पार्थिव असे खेळाडू आहेत जे देखील १३-१३ वेळा 'डक' चे शिकार झाले आहेत.
रोहित शर्माचा फॉर्म यंदाच्या आयपीएलमध्ये चांगला राहिला नाही. रोहित आयपीएलचे प्लेऑफ, सेमीफायनल, फायनल आणि नॉकआऊट सामन्यात चांगला परफॉर्मन्स करू शकले नाहीत.
आयपीएलमध्ये रोहित चौथ्यांदा पहिलाच चेंडू खेळताना शुन्यावर बाद (गोल्डन डकवर) झाला आहे. त्याला आत्तापर्यंत उमेश यादव, जोफ्रा आर्चर आणि आर अश्विन यांनी त्याला गोल्डन डकवर बाद केले आहे.
विशेष गोष्ट अशी की आयपीएलमध्ये २०१८ च्या आधी रोहित कधीही गोल्डन डकवर बाद झाला नव्हता. पण २०१८ नंतर तो चारवेळा गोल्डन डकवर बाद झाला आहे.