मुंबई : भारतीय क्रिकेट संघ आणि IPL 2020 मध्ये बंगळुरूच्या संघाकडून खेळणाऱ्या फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल याच्या होणाऱ्या पत्नीनं गेल्या काही दिवसांपासून नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. फक्त चहलची होणारी पत्नी म्हणूनच नव्हे, तर धनश्री वर्मा ही तिच्या नृत्यकौशल्यामुळंही अनेकांची मनं जिंकत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेकदा ती सोशल मीडियावर काही डान्स व्हिडिओ शेअर करत असते. एक सुरेख नृत्यांगना म्हणूनही तिची ओळख आहे. अशा या नव्या सोशल मीडिया सेन्सेशननं पुन्हा एक नवा व्हिडिओ शेअर केला आहे. 


धनश्रीचा नवा डान्स व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती सैफ अली खानची मुख्य भूमिका असणाऱ्या 'जवानी जानेमन' या चित्रपटातील 'गल्ला गोरियां' या गाण्यावर ठेका धरताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये क्र्यू मेंबर्सची तिला साथ मिळत आहे. 


 

 

 

 



A post shared by Dhanashree Verma (@dhanashree9) on


सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओला अनेकांनी पसंत केलं असून, कमेंट ब़ॉक्समध्ये धनश्रीची प्रशंसा केली आहे. अडीच लाखांहून अधिक लाईक्स मिळवणारा हा व्हिडिओ येत्या काळात आणखी व्हायरल होण्याची चिन्हंही आहेत. मुख्य म्हणजे आता येत्या काळात पुन्हा एकदा धनश्री कोणत्या गाण्यावर ठेका धरणार याची उत्सुकताही अनेकांना लागली आहे.