अबुधाबी : आयपीएलचा 15 वा सामना राजस्थान रॉयल्स आणि आरसीबी यांच्यात अबुधाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर खेळला गेला. सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. राजस्थान रॉयल्सने प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केला आहे आणि अंकित राजपूतच्या जागी महिपाल लोम्मरला स्थान दिले आहे, तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ कोणताही बदल न करता मैदानात उतरला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सामन्यात प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या राजस्थान रॉयल्स संघाने 20 ओव्हरमध्ये 2 गडी गमावून 154 धावा केल्या. आरसीबीला विजयासाठी 20 ओव्हरमध्ये 155 धावांची आवश्यकता होती. राजस्थान रॉयल्सकडून महिपाल लोमरने सर्वाधिक 47 धावा केल्या. त्याचवेळी युजवेंद्र चहलने 3 गडी बाद केले. लक्ष्याचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने 19.1 ओव्हरमध्ये 2 गडी गमावून 158 धावा केल्या. आरसीबीकडून देवदत्त पडिककलने 45 बॉलमध्ये 63 धावा केल्या, तर विराट कोहलीने 71 रन केले.


आरसीबीचा हा तिसरा विजय आहे. तर राजस्थान रॉयल्सचा हा दुसरा पराभव आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने राजस्थान रॉयल्सचा 8 गडी राखून पराभव केला.