मुंबई : इंडियन प्रीमियर लीग 2020 मध्ये आतापर्यंत 11 सामने खेळले गेले आहेत. प्रत्येक सामन्यामध्ये स्पर्धा पाहायला मिळाली. शेवटच्या क्षणापर्यंत बॉल आणि फलंदाजी दरम्यान प्रचंड संघर्ष सुरू होता. यामुळे चौकार आणि षटकारांचा पाऊस देखील पाहायला मिळतो. लीगच्या पहिल्या 11 सामन्यात 162 सिक्स लागले आहेत. त्यापैकी एकट्या शारजाह क्रिकेट स्टेडियममध्ये 50 हून अधिक सिक्स लागले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संजू सॅमसन सर्वांवर भारी


राजस्थान रॉयल्सचा खेळाडू संजू सॅमसनने लीगमध्ये सिक् मारणाऱ्यांच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. त्याच्या खात्यात अवघ्या 2 सामन्यात 16 सिक्सची नोंद झाली आहे. संजूनंतर किंग्ज इलेव्हन पंजाबची सलामीची जोडी आहे. ज्यामध्ये मयंक अग्रवालने 11 तर केएल राहुलने 9 सिक्स मारले आहेत.


केएल राहुलसह तिसऱ्या स्थानावर मुंबईचा ईशान किशन ही आहे. त्याने देखील एका सामन्यात 9 सिक्स मारले आहेत. मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा, आरसीबीचा एबी डिव्हिलियर्स आणि चेन्नई सुपर किंग्जचा फाफ डु प्लेसिस यानंतर यादीमध्ये येतात. या चौघांच्या खात्यात 7  सिक्स आहेत. 


केएल राहुलने आतापर्यंत 23 फोर, मयंक अग्रवालने 21 फोर मारले आहेत. या दोघांव्यतिरिक्त कोणीही 12 पेक्षा अधिक फोर मारलेले नाहीत.


राजस्थानच्या नावावर सर्वाधिक सिक्स


जर संघांबद्दल बोलायचं झालं तर राजस्थान रॉयल्सच्या संघाने सर्वाधिक सिक्स मारले आहेत. या लीगमध्ये आतापर्यंत 2 सामने खेळले गेले आहेत, संजू सॅमसनमुळे राजस्थानच्या खात्यात 35 सिक्सची नोंद झाली आहे. दुसर्‍या स्थानावर 29 सिक्ससह मुंबई इंडियन्स आहे. 24  सिक्ससह पंजाब तिसऱ्या स्थानावर आहे.


चेन्नई सुपर किंग्जच्या नावावर 22, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या नावावर 17, दिल्ली कॅपिटलच्या नावावर 13, सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्सच्या नावावर 11 सिक्सचा समावेश आहे.


पंजाबच्या नावावर सर्वाधिक फोर


सिक्स मारणाऱ्यांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर असलेला पंजाब संघ फोर मारणाऱ्यांच्या यादीत मात्र पहिल्या स्थानावर आहे. पंजाबने 53 फोर मारले आहेत. त्यानंतर दिल्ली कॅपिटलने 41, आरसीबीने 40, चेन्नई सुपर किंग्जने 34, मुंबई इंडियन्सने 34, सनरायझर्स हैदराबादने 33, केकेआरने 27 आणि राजस्थान रॉयल्सने 23 फोर मारले आहेत.