मुंबई : आयपीएलच्या 14 व्या मोसमातील (IPL 2021) 32 वा सामना (IPL 2021 32Th Match) आज खेळवण्यात येणार आहे. या सामन्याचे आयोजन हे दुबई क्रिकेट स्टेडियममध्ये (Dubai Cricket Stadium) करण्यात आले आहे. या सामन्यात पंजाब (PBKS) विरुद्ध राजस्थान (RR) आमनेसामने असणार आहेत. या दोन्ही संघांचा या दुसऱ्या टप्प्यातील पहिलाच सामना असणार आहे. (Ipl 2021 21 september 2021 today 32nd Match pbks vs rr see head to head record punkab kings and rajasthan royals)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिल्या टप्प्यामध्ये दोन्ही संघांची स्थिती जवळपास सारखीच होती. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी खोऱ्याने धावा केल्या. मात्र टॉप 4 मध्ये स्थान मिळवता आले नाही. 


पंजाबने 8 सामन्यांपैकी 3 सामन्यात विजय मिळवला आहे. पंजाब पॉइंट्सटेबलमध्ये 6 पॉइंट्ससह सातव्या क्रमांकावर आहे. तर राजस्थाननेही 7 पैकी 3 मॅचेसमध्ये प्रतिस्पर्धी संघावर मात केली आहे. तर बाकी सामन्यात पराभवाला सामोरे जावं लागलं आहे. राजस्थान 3 विजयांसह 6 व्या क्रमांकावर आहे. 


एकाबाजूला राजस्थानमध्ये एविन लुईस आणि लियाम लिविंगस्टोनसारखे धडाकेबाज फलंदाज आहे. तर दुसऱ्या बाजूला पंजाबचे ख्रिस गेल आणि कर्णधार केएल राहुल आहे. राजस्थानला जॉस बटलरची उणीव जाणवेल. तर लुईसमुळे मधली फळी आणखी मजबूत होईल. अखेरच्या रंगतदार झालेल्या सामन्यात पंजाबने राजस्थानचा पराभव केला होता. 


अशी आहे उभयसंघाची आयपीएलमधील कामगिरी


आयपीएलमध्ये आतापर्यंत दोन्ही संघांचा एकूण 22 वेळा आमनासामना झाला आहे. यामध्ये राजस्थान पंजाबवर वरचढ राहिले आहेत. राजस्थानने पंजाबवर या 22 पैकी 12 सामन्यात मात केली आहे. तर प्रत्युतरात पंजाबनेही 10 सामन्यात विजय मिळवला आहे.  


अखेरच्या सामन्यात पंजाब विजयी


उभयसंघातील अखेरचा सामना हा रंगतदार झाला होता. अखेरच्या चेंडूवर सामन्याचा निकाल लागला होता. हा सामना मुंबईत खेळवण्यात आला होता. पंजाबने पहिले बॅटिंग करताना 6 विकेट्सच्या मोबदल्यात 221 धावा केल्या होत्या. त्यामुळे राजस्थानला विजयासाठी 222 धावांचे मजबूत आव्हान मिळाले होते.


पंजाबकडून कर्णधार केएल राहुलने 50 चेंडूत 182 च्या स्ट्राईक रेटने 91 धावा चोपल्या होत्या. केएलने या खेळीत 7 चौकार आणि 5 सिक्स ठोकले होते.   


विजयी आव्हानाचं पाठलाग करताना राजस्थानकडून संजू सॅमसनने धमाकेदार शतक लगावलं होतं. या शतकामुळे राजस्थानच्या आशा कायम होत्या.  मात्र शेवटच्या काही ओव्हरमध्ये सामना पंजाबच्या बाजूने झुकला.  राजस्थानचा अवघ्या 4 धावांनी पराभव झाला. 


दरम्यान आता प्लेऑफमधील आव्हान कायम राखण्यासाठी दोन्ही संघासाठी आजचा विजय आवश्यक असणार आहे. त्यामुळे या सामन्यात पंजाब विजयश्री पटकावणार की राजस्थान मैदान मारणार, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.