मुंबई : आयपीएलच्या (IPL 2021) चौदाव्या हंगामाचा दुसरा टप्पा आता अधिक चुरशीचा होत चालला आहे. प्रत्येक सामन्यासह प्लेऑफमध्ये जाण्याची स्पर्धा अधिक कठिण होत चालली आहे. प्लेऑफ गाठण्यासाठी आता प्रत्येक सामना प्रत्येक टीमसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. प्लेऑफच्या शर्यतीत पहिल्या 3 टीमचं स्थान जवळपास निश्चित झालं आहे. आता खरी लढत फक्त एका जागेसाठी. कारण त्या एका जागेसाठी एक-दोन नाही तर तब्बल चार दावेदार आहेत. या चार टीमकडे सध्या समान गुण आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चेन्नई सुपर किंग्स : आयपीएलच्या चौदाव्या हंगामात धोणीच्या (MS Dhoni) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सने (CSK) पॉईंटटेबलमध्ये (IPL Point Table) अव्वल स्थान गाठलं आहे. चेन्नईने 10 पैकी 8 सामने जिंकले असून त्यांच्या खात्यात 16 पॉईंट जमा झाले आहेत. त्यामुळे चेन्नईची प्लेऑफ गाठण्याची शक्यता 99.99 टक्के आहे. आयपीएलच्या इतिहासात 16 गुण मिळवणाऱ्या कोणत्याही संघाला प्ले ऑफचं (IPL Playoffs) तिकिट मिळालं नाही असं घडलेलं नाही. त्यामुळे चेन्नईने उर्वरित 4 सामन्यांपैकी 1 सामना जरी जिंकला तरी चेन्नईची टीम प्लेऑफमध्ये खेळताना दिसेल.


दिल्ली कैपिटल्स : युवा ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) नेतृत्वाखाली खेळणारी दिल्ली कॅपिटल्सही (Delhi Capitals) यंदा चांगलीच फॉर्मात आहेत. दिल्ली कॅपिटल्स पॉईंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर असून दिल्लीनेही 10 सामन्यांपैकी 8 सामने जिंकले आहेत. त्यांच्या खात्यात 16 पॉईंट जमा आहेत. म्हणजेच दिल्ली कॅपिटल्सचीही प्लेऑफमध्ये पोहचण्याची पूर्ण शक्यता आहे. उर्वरीत 4 सामन्यांपैकी एका सामन्यात दिल्ली विजयी झाल्यास त्यांना प्लेऑफ पासून कोणी रोखू शकत नाही.


रॉयल चॅलेंजर्स बंगलोर : विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या (RCB) खात्यात 12 पॉईंट जमा आहेत. प्ले ऑफसाठी बंगलोरही मजबूत दावेदार आहे. पण यासाठी उर्वरीत 4 सामन्यांपैकी बंगलोरला किमान 2 सामने जिंकावे लागतील.


कोलकाता नाईट रायडर्स (KKR), पंजाब किंग्स (PBKS), राजस्थान रॉयल (RR) आणि मुंबई इंडियन्स (MI) या चार टीमच्या खात्यात सारखेच म्हणजे 8 पॉईंट जमा आहेत. प्लेऑफच्या एका जागेसाठी या चारही टीममध्ये तगडी टक्कर आहे. यातही कोलकातासाठी जमेची बाजू म्हणजे टीमचा नेट रन रेट उर्वरित तीन टीमपेक्षा चांगला आहे. आणि रनरेटवर टीमचं भवितव्य ठरणार असेल तर शाहरुख खानची कोलकाता यात नक्कीच बाजी मारु शकेल. 


सनराइजर्स हैदराबाद : 10 मॅच खेळून एक विजय मिळणारी सनरायझर्स हैदराबाद पहिली टीम आहे जी प्लेऑफमधून आधीच बाहेर पडली आहे.