मुंबई : आयपीएल 2021 सुरू होण्यास काही तास शिल्लक आहेत, पण सलामीच्या सामन्यापूर्वी या मेगा टी -20 लीगमध्ये बॉलिवूडचा तडका लागला आहे. प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंगची क्रिकेटच्या मैदानावर एन्ट्री झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगने मुंबईच्या क्रिकेट मैदानावर दिल्ली कॅपिटल्सचा फलंदाज अजिंक्य रहाणे याची भेट घेतली. रणवीरने रहाणेसोबत एक फोटो शेअर करत म्हटलं की. 'टूर्नामेंटसाठी ऑल दी बेस्ट चॅम्पियन'


या दरम्यान अजिंक्य रहाणे आणि रणवीर सिंग यानी क्रिकेटचा ही आनंद घेतला. रहाणे याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडिओ शेअर करता लिहिले की, "जेव्हा सिंबा माझ्या गल्लीत येतो तेव्हा एक क्रिकेटचा शॉट तर झालाच पाहिजे."



अजिंक्य रहाणेची टीम दिल्ली कॅपिटल्स आपला पहिला सामना 10 एप्रिल रोजी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबईच्या (मुंबई) वानखेडे स्टेडियमवर खेळणार आहे.



रणवीर सिंग आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी क्रिकेट मैदानात पोहोचला. दिग्गज क्रिकेटपटू कपिल देव यांच्या जीवनावर आधारित '83' हा चित्रपट 4 जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रणवीरने मुख्य भूमिका साकारली आहे.