मुंबई: शिवम मावीने टाकलेल्या पहिल्या ओव्हरमधून पृथ्वी शॉनं एक नाही दोन नाही तर 6 चौकार ठोकत 25 धावांची खेळी केली आहे. कोलकाताची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिल्यानं संघाचा कोचही नाराज आहे. तर पृथ्वीच्या कामगिरीचं दिल्ली संघाकडूनच नाही तर जगभरातून कौतुक होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वीरेंद्र सेहवाग यांच्यासोबत कोलकाताच्या कोचनं देखील पृथ्वीचं कौतुक केलं आहे. ब्रेंडन मॅक्युलम यांनी कोणाचं विशेष नाव घेतलं नाही. पण फॉर्मात नसलेल्या खेळाडूंमध्ये शुभमन गिलचा उल्लेख केला आहे. 


शुभमन गिलनं 7 सामन्यांमध्ये आतापर्यंत केवळ 132 धावा केल्या आहेत. अत्यंत खेदजनक आणि निराशाजनक केकेआरची कामगिरी राहिल्याचं देखील केकेआरच्या कोचने म्हटलं आहे. 'कोलकाताचे फलंदाज ज्या आक्रमकतेनं खेळू शकतात तो परफॉर्मन्स अजूनही संघानं दिलेला नाही. मैदानात उतरल्यानं आक्रमकपणे खेळायला हवं विशेषत: तुमच्यावर प्रेशर नसतं किंवा तुमच्यावर दबाव नसतो तेव्हा. '


मी आणि संघाचा कर्णधार इयोन मॉर्गन अनेकवेळा हे सांगतो मात्र खेळाडू तेवढ्या आक्रमकपणे खेळाडू उतरत नाहीत. पृथ्वी शॉ खूप छान पद्धतीनं खेळत होता आणि फलंदाजांनी त्याच्याकडून हेच शिकायला हवं.


'पृथ्वीची खेळी म्हणजे आम्हाला कसे खेळायचे आहे हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. तुम्ही प्रत्येक चेंडूवर नेहमीच एक षटकार किंवा षटकार मारू शकत नाही परंतु असे करण्याचा तुमचा हेतू असावा, खासकरून जेव्हा तुम्हाला मोकळेपणाने खेळण्याची परवानगी असेल. '