मुंबई: कोलकाता विरुद्ध झालेल्या सामन्यात 18 धावांनी चेन्नई सुपरकिंग्स संघाने विजय मिळवला आहे. या विजयासोबतच IPLच्या पॉइंट टेबलमध्ये RCB संघाला मागे सारत चेन्नई संघ पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. चेन्नई संघानं सलग तिसऱ्यांदा विजय मिळवत हॅट्रिक पूर्ण केली आहे. असं करणारा IPLमधील हा दुसरा संघ ठरला पहिली हॅट्रिक रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने केली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चेन्नई सुपरकिंग्स संघाने वानखेडेवर पहिली फलंदजी केली. यावेळी माही देखील मैदानात उतरला. फफ ड्युप्लेसिसचं शतक हुकलं मात्र त्याने संघाची विजयावर पकड मजबूत करत कोलकातासमोर 221 धावांचं आव्हान ठेवलं. 





या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाता संघाला बऱ्याच अडचणी आल्या. नितीश राणा अवघ्या 9 धावांवर आऊट झाला. फलंदाजीतील पहिल्या फळीला धावा काढण्यात यश मिळालं नाही. शुभमन गिलला मैदानात येताच पुन्हा तंबुत जाण्याची वेळ आली. दिनेश कार्तिक, आंद्रे रसेल, पॅट कॉमिनसन या तिघांनी आपली कामगिरी उत्तम निभावली. मात्र विजयासाठी 18 धावा कमी पडल्या. 


चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने देखील 17 धावा केल्या त्यानंतर तो कॅच आऊट झाला. त्याने मैदानात आल्यानंतर 2 चौकार, 1 षटकार ठोकला. चेन्नईच्या गोलंदाजांनी कमाल कामगिरी निभावली. फलंदाजीतील पहिल्या फळीला जास्त धावा काढू दिल्या नाहीत. दिपक चहरनं 4 तर लुंगीनं 3 विकेट्स काढल्या.