मुंबई: तीन वेळा चॅम्पियन राहिलेल्या चेन्नई सुपरकिंग्स संघाला मुंबई इंडियन्स विरुद्ध सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. जिंकत आलेला सामना काही सेकंदात पलटला आणि बाजी मुंबईने जिंकली. या पराभवाचं मोठं कारण महेंद्र सिंह धोनीने सांगितलं आहे. तर धोनीच्या एका चुकीच्या निर्णयामुळे मुंबई संघ जिंकल्याची सोशल मीडियावर चर्चा आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर चेन्नईनं 4 गडी गमावून 218 धावा केल्या. शेवटच्या ओव्हरमध्ये किरोन पोलार्डने सामना मुंबई संघाला जिंकवून दिला. या शेवटच्या दोन ओव्हरमध्ये नेमकं काय चुकलं याबाबत धोनीने सांगितलं आहे. 'आम्ही कॅच सोडले ही सर्वात मोठी चूक होती. महत्त्वाच्या क्षणी कॅच सुटल्यामुळे मुंबई संघाचा फायदा झाला.' 


'पाँईट टेबलच्या दृष्टीनं एक दिलासा असला की आम्ही नंबर वन आहोत. तरी देखील प्रत्येक सामना आमच्यासाठी तितकाच महत्त्वाचा आहे. त्यामुळे रणनिती ही प्रत्येक सामन्यासाठी ठरवली जाते. या पराभवातूनही आम्हाला खूप काही शिकायला मिळालं आहे.  एका सामन्यात तुम्ही मॅच जिंकताही आणि एका सामन्यात तुम्ही मॅच जिंकता जिंकता पराभव हाती येतो. त्यामुळे कुठेही गाफील राहुन चालत नाही. '


महेंद्रसिंह धोनी काय म्हणाला ऐकण्यासाठी इथे क्लिक करा


दुसरीकडे किरोन पोलार्ड षटकार आणि चौकार ठोकत असल्यानं धोनीने 30 यार्डमध्ये फील्डर न ठेवता बाऊन्ड्री लाईनवर ठेवला. त्यामुळे शेवटच्या बॉलवर पोलार्डला धावून 2 रन काढणं सहज शक्य झालं त्यामुळे धोनीचा हा निर्णय चुकला अशी टीका सोशल मीडियावर चाहत्यांकडून होत आहे. 


मुंबई इंडियन्स संघाने 6 गडी गमावून 319 धावांचं लक्ष्य गाठलं आहे. मुंबई संघाने चेन्नई सुपरकिंग्स संघाला मिळणारा विजय हिसकावून आणला आहे. पोलार्डने शेवटच्या ओव्हरमध्ये कमालीची कामगिरी केली आहे. 17 चेंडूमध्ये अर्धशतक तर 34 चेंडूमध्ये 87 धावा 6 चौकार आणि 8 षटकारांसह केल्या आहेत.