मुंबई: तीन वेळा चॅम्पियन राहिलेल्या चेन्नई विरुद्ध 6 वेळा चॅम्पियनशिप मिळवलेल्या मुंबई इंडियन्स संघाचा अटीतटीचा सामना झाला. या सामन्यातील शेवटच्या दोन ओव्हर अगदी महत्त्वपूर्ण ठरल्या आहेत. पोलार्डनं बाजी पलटली आणि मुंबई संघचा विजय झाला. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर चेन्नईनं 4 गडी गमावून 218 धावा केल्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई इंडियन्स संघाला चेन्नईनं 219 धावांचं लक्ष्य दिलं. या लक्ष्याचा पाठलाग करत रोहित शर्माच्या टीमने 6 गडी गमावून सामना जिंकला आहे. किरोन पोलार्डने शेवटच्या ओव्हरमध्ये कमालीची खेळी केली. 



पोलार्डने 34 चेंडूमध्ये 87 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने सर्वात लांब सिक्स देखील ठोकला आहे. 6 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने त्याने 87 धावा केल्या. शेवटच्या चेंडूवर दोन धावांची आवश्यकता असताना त्यांनी धावून काढत मुंबई संघाला विजय मिळवून दिला आहे.


मुंबई विरुद्ध चेन्नई झालेल्या रोमांचक सामन्यानंतरही मुंबई संघ पॉइंट टेबलमध्ये चौथ्याच स्थानावर आहे. सात सामन्यांपैकी 4 सामने मुंबई संघ जिंकला आहे. तर तीन सामने संघाने गमावले आहेत. दुसरीकडे चेन्नई संघाने 7 पैकी 5 सामन्यांमध्ये विजय मिळवला तर 2 सामने गमवले आहेत. चेन्नई पहिल्या स्थानावर कायम आहे.