मुंबई: बंगळुरू विरुद्ध 65 धावांनी विजय मिळवलेल्या चेन्नई सुपरकिंग्स संघाचा सामना आज हैदराबाद सोबत होणार आहे. दिल्लीतीस स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता आज डेव्हिड वॉर्नर विरुद्ध महेंद्र सिंह धोनी सामना रंगणार आहे. या सामन्याआधी IPLच्या इतिहासातील पानांवर एक नजर टाकूया किती गेल्या 13 हंगामांमध्ये कोण किती सामने जिंकलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध हैदराबाद संघ IPLच्या इतिहासात 14 सामने खेळले आहेत. त्यापैकी 10 सामने चेन्नई सुपरकिंग्स संघ जिंकला आहे. तर उर्वरित 4 सामने जिंकण्यात हैदराबादला यश मिळालं आहे. चेन्नई सुपरकिंग्,ने 223 धावांचा सर्वाधिक स्कोअर केला होता. तर हैदराबाद संघ 192 च्य़ा पुढे जाऊ शकला नाही. 


बंगळुरू विरुद्ध झालेल्या सामन्यात शेवटच्या ओव्हरमध्ये जडेजा गेमचेंजर ठरला आहे. तर दुसरीकडे हैदराबद संघाने पुन्हा एकदा विजय मिळवण्यासाठी कंबर कसली आहे. त्यामुळे वॉर्नर विरुद्ध धोनी हा सामना जबरदस्त रंगणार आहे. 




चेन्नई सुपकिंग्स संघातील संभाव्य प्लेइंग इलेव्हन
ऋतुराज गायकवाड, फाफ ड्युप्लेसी, सुरेश रैना, मोईन अली, अंबाती रायडू, रविंद्र जडेजा, महेंद्र सिंह धोनी, सॅम करन, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, इम्रान ताहिर


सनरायझर्स हैदराबाद संभाव्य प्लेइंग इलेव्हन 
डेव्हिड वॉर्नर, जॉनी बेअरस्टो, केन विल्यमसन, मनीष पांड्ये, विजय शंकर, अभिषेक शर्मा, केदार जाधव, राशीद खान, जगदीश, खलिल अहमद/भुवनेश्वर कुमार , सिद्धार्थ