स्टार बॉलर आर अश्विनच्या कुटुंबात कोरोनाचं थैमान, 10 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह
आर अश्विनचं कुटुंब सध्या कोणत्या परिस्थितून जात आहे हे त्याच्या पत्नीनं ट्वीट करून सांगितलं आहे.
मुंबई: दिल्ली कॅपिटल्स संघातील स्टार बॉलर आर अश्विननं IPLमधून ब्रेक घेतला होता. कुटुंबियांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं IPLमधून ब्रेक घेत असल्याची माहिती त्याने ट्वीटरवरून स्वत: दिली होती. सध्या अश्विननच्या कुटुंबात कोरोनाचा कहर सुरू आहे. त्यामुळे सर्वजण एकमेकांसाठी प्रार्थना करत आहेत. अश्विननचे चाहते देखील त्यांच्या कुटुंबियांसाठी प्रार्थना करत आहेत.
आर अश्विननची पत्नी प्रीतीने कोणत्या परिस्थितीतून आम्ही सध्या जात आहोत त्याची माहिती ट्वीट करून दिली आहे. 'एका आठवड्यापासून आमच्या कुटुंबातील 6 मोठे तर 4 मुलं अशा 10 जणांना मिळून कोरोनाची लागण झाली आहे. या सगळ्यांवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.'
कोरोनाच्या या महासंकाटत आपली आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घेण्याचं आवाहन देखील आर अश्विनच्या पत्नीने केलं आहे. कोरोनाची लस घेण्याचं आवाहन देखील ट्वीटमधून केलं आहे.
'शरीराने लवकर बरं होणं सोपं आहे पण मनाने जास्त कठीण आहे. पाच ते आठ दिवसांपर्यंतचा काळ सर्वात वाईट होता. कोरोना हा आजार तुम्हाला एकट्याला लढायचा असतो. मदतीसाठी सगळे असतात पण कोणीच प्रत्यक्षात तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. तुम्ही अगदी एकटे होऊन जाता.'
आर अश्विनचं कुटुंब कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे त्याने IPLमधून ब्रेक घेतला आहे. परिस्थिती नियंत्रणात आल्यावर पुन्हा खेळण्यासाठी परत येईन असा विश्वास त्यानं व्यक्त केला आहे. आर अश्विनचं कुटुंब कोरोनातून लवकर बरं व्हावं यासाठी सर्वजण प्रार्थना करत आहेत.