IPL 2021 : दिल्लीवर पुन्हा भारी पडणार कोलकाता? असे आहेत Head to Head आकडे
दिल्ली आणि कोलकाता संघ यापूर्वी 2008 ते 2020 पर्यंतच्या हेड टू हेड नुसार 29 वेळा मैदानात एकमेकां विरुद्ध खेळाले आहेत.
मुंबई: आयपीएल 14 च्या हंगामातील दुसऱ्या टप्प्यातील सामने अंतिम टप्प्यात आले आहेत. कोलकाता संघाने RCB ला पराभूत करून दुसऱ्या क्वालीफायर राऊंडमध्ये धडक दिली आहे. आज दिल्ली विरुद्ध कोलकाता सामना संध्याकाळी 7.30 वाजता रंगणार आहे. करो या मरोची लढाई आज मैदाना होणार आहे.
Qualifier 2 मध्ये शारजाह मैदानात दिल्ली विरुद्ध कोलकाता सामना होणार आहे. या सामन्यात कोलकाता संघाला पुन्हा एकदा विजय मिळवण्यात यश येईल का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. कोलकाता संघाने पहिल्या टप्प्यात विशेष कामगिरी केली नव्हती. मात्र दुसऱ्या टप्प्यात पुन्हा एकदा फुल फॉर्ममध्ये उतरला. सर्वांच्या मागून येत कोलकाता संघाने दुसऱ्या क्वालीफायरपर्यंत मजल मारली.
दिल्ली आणि कोलकाता संघ यापूर्वी 2008 ते 2020 पर्यंतच्या हेड टू हेड नुसार 29 वेळा मैदानात एकमेकां विरुद्ध खेळाले आहेत. त्यापैकी 15 सामने कोलकाता संघ जिंकला आहे. तर 13 सामने जिंकण्यात दिल्ली संघाला यश आलं आहे. तर एका सामन्याचा निर्णय झाला नाही.
यंदाच्या हंगामात शारजाहवर कोलकाता विरुद्ध दिल्ली दुसऱ्यांदा आमनेसामने येणार आहेत. यापूर्वीच्या सामन्यात कोलकाता संघाने दिल्ली संघाला 3 विकेट्सने पराभूत केलं होतं. सुनील नरेन मॅन ऑफ द मॅच ठरला होता. कोलकाता संघाने RCB विरुद्धचा सामना देखील जिंकला आहे.
दिल्ली संघातील झंझावाती फलंदाजांना कोलकाताचे गोलंदाज कसे रोखणार? दिल्ली संघाला कोलकातावर विजय मिळवून अंतिम सामन्यात पोहोचण्यात यश मिळणार का? आजच्या सामन्यात कोण जिंकणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.