मुंबई: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने 1 रनने दिल्ली कॅपिटल्स संघावर विजय मिळवला आहे. अत्यंत रोमांचक झालेल्या सामन्यात कोहलीच्या टीम पुन्हा एकदा पहिल्या फॉर्ममध्ये खेळताना दिसली. मैदानात दिल्लीच्या फलंदाजी दरम्यान एक घटना घडली आणि विराट कोहलीने त्या घटनेवर दिलेले हावभाव वाऱ्याच्या वेगानं सोशल मीडियावर व्हायरल झाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्ली कॅपिटल्स संघाकडून ऋषभ पंत क्रिझवर खेळत होता. 7 व्या ओव्हरदरम्यान वॉशिंग्टन सुंदर गोलंदाजी करत होता. पहिल्याच गुगली बॉलनं ऋषभला चकवलं. सर्वांना वाटलं ऋषभ आऊट झाला म्हणून मैदानात सर्वजण नाचू लागले. त्याचा रिव्ह्यू झाल्यानंतर अंपायरने ऋषभला नॉटआऊट झाला आहे. 





पंतला DRS मुळे फायदा झाला आणि त्यामुळे त्याला नॉटआऊट देण्यात आलं. अंपायरनं दिलेल्या निर्णयानंतर विराट कोहलीचा चेहऱ्यावरचे भाव बदलले आणि तो पाहातच राहिला. त्याच्या हावभावांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


IPL 2021 : 'वाढत्या कोरोनामुळे भारतात मला सुरक्षित वाटत नव्हतं'


ऋषभ पंतने 58 तर शिमरोनने 53 धावांची अर्धशतकी खेळी केली. मात्र विजयासाठी एक-दोन धावा कमी पडल्यानं अखेर पदरी निराशाच पडली. त्यामुळे मैदानात सामना संपल्यानंतर पंत खूप निराश असल्याचं पाहायला मिळालं. तर बंगळुरू संघाला पुन्हा एकदा विजय मिळाला आहे. पॉइंट टेबलवर बंगळुरू तिसऱ्या तर दिल्ली तिसऱ्या स्थानावर आहे.