मुंबई: आयपीएलमध्ये मुंबई विरुद्ध दिल्ली सामना सुरू आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. तर मुंबई इंडियन्स संघ फलंदाजी करणार आहे. मुंबई संघाला प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी हा सामना जिंकणं अत्यंत महत्त्वाचं आहे. हा सामना हातून निसटला तर प्ले ऑफमध्ये जाणं मुंबई संघासाठी अडचणीचं ठरू शकतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुंबई संघाने आपल्या प्लेइंग इलेव्हनमधून ईशान पाठोपाठ आणखी एका खेळाडूला डिच्चू दिला आहे. त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी देण्यात आली नाही. दिल्ली संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये देखील बदल करण्यात आला आहे. 


दिल्ली संघात ललित यादवच्या जागी पृथ्वी शॉ परतला आहे. त्याचबरोबर मुंबईच्या प्लेइंग -11 मध्येही बदल झाला आहे. राहुल चाहरच्या जागी जयंत यादवला संधी देण्यात आली आहे. मुंबई संघ 11 सामन्यांपैकी 5 सामने जिंकून पॉइंट टेबलमध्ये सहाव्या स्थानावर आहे. प्ले ऑफमध्ये जाण्य़ासाठी मुंबई संघाला दिल्लीला टफ फाईट देऊन त्यांचा पराभव करावा लागणार आहे. 


काय सांगतात हेड टू हेडचे अंदाज


दिल्ली विरुद्ध मुंबई आतापर्यंत झालेल्या आयपीएल सामन्यांमध्ये 29 वेळा एकमेकांविरुद्ध मैदानात उतरले आहेत. त्यापैकी 13 सामने दिल्ली संघाने जिंकले आहेत. तर 16 सामन्य़ांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. दुसरीकडे मुंबई संघ 16 सामने जिंकला आहे. 5 वेळा IPL ची ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सला यंदाही हा मान कायम टिकवता येणार का याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.