... तर इंग्लंडचे खेळाडू IPL 2021चे उर्वरित सामने खेळू शकणार नाहीत
जूननंतर इंग्लंड क्रिकेट संघाचे क्रिकेट वेळापत्रक खूप व्यस्त असणार आहे. त्यामुळे आयपीएलचे उर्वरित सामने यावर्षी पुन्हा घेण्यात आले तर इंग्लंडचे क्रिकेटपटू खेळू शकणार नाहीत.
मुंबई: बायो बबलमध्ये कोरोना शिरला. 4 खेळाडू आणि दोन कोच यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर IPL 2021चे उर्वरित सामने स्थगित करण्यात आले आहेत.आयपीएलचे 60 पैकी फक्त 29 सामने झाले आहेत. उर्वरित 31 सामने टी -२० विश्वचषक होण्यापूर्वी सप्टेंबरच्या शेवटी किंवा नोव्हेंबरच्या मध्यभागी आयोजित करण्यात येतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
जूननंतर इंग्लंड क्रिकेट संघाचे क्रिकेट वेळापत्रक खूप व्यस्त असणार आहे. त्यामुळे आयपीएलचे उर्वरित सामने यावर्षी पुन्हा घेण्यात आले तर इंग्लंडचे क्रिकेटपटू खेळू शकणार नाहीत. त्यामुळे इंग्लंडच्या खेळाडूंसमोर मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.
ईसीबी क्रिकेटचे संचालक एशले जिल्स यांनी ही माहिती दिली. इंग्लंडची टीम सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान बांग्लादेश दौऱ्यावर असणार आहे. टी 20 वर्ल्डकपनंतर एशेज सीरिज खेळवली जाणार आहे. त्यामुळे इंग्लंडच्या क्रिकेट टीमचं एकूणच शेड्युल खूप वस्त राहणार आहे. IPLच्या वेगवेगळ्या टीममध्ये इंग्लंडचे 11 खेळाडू सहभागी झाले होते. त्यामुळे आता त्यांच्यासमोर काय करायचं असा पेच निर्माण झाला आहे.
जाइल्स यांनी दिलेल्या माहितीनुसार IPLचे सामने कसे कधी आणि कुठे होणार याबाबत सध्यातरी कोणतीही माहिती नसल्याचं सांगितलं आहे. सध्या इंग्लंडमध्ये न्यूझीलंड विरुद्ध भारत 18 ते 22 जून दरम्यान होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सामन्याची तयारी सुरू आहे.
4 ऑगस्टपासून इंग्लंड विरुद्ध भारत सीरिज आहे. त्यानंतर टी 20 वर्ल्डकप आणि एशेज सीरिज त्यासोबत बांग्लादेश दौरा देखील असणार आहे. त्यामुळे इतक्या व्यस्त शेड्युलमधून वेळ काढून IPLमध्ये कसे खेळायचे हा इंग्लंडच्या खेळाडूंसमोर मोठा प्रश्नच असणार आहे.