मुंबई: आयपीएल सीझन लवकरच सुरू होत आहे. त्यासाठी 18 फेब्रुवारीला लिलाव होणार आहे. त्यासाठी बीसीसीआयने 292 खेळाडूंच्या नावांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये 164 भारतीय तर 125 विदेशी खेळाडूंचा समावेश आहे. असोसिएट देशातील 3 खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. चेन्नई टी 20 मध्ये दमदार कमगिरी करणाऱ्या इंग्लंडच्या खेळाडूवर सर्वाधिक लिलावाचे पैसे लावले जाऊ शकतात असा अंदाज आहे. 
 
आयपीएल 2021 च्या लिलावात फ्रँचायझी कोट्यवधी रुपयांची लूट करु शकतात.  यावेळी टी -20 क्रिकेटमध्ये फलंदाजीत माहिर असलेल्या इंग्लंडचा फलंदाज डेव्हिड मालनवर सर्वाधिक बोली लावली जाण्याची शक्यता आहे. 33 वर्षांचा डेव्हिड सध्या फॉर्ममध्ये आहे. 10 कोटींपेक्षा अधिक त्याच्यावर बोली लावली जाऊ शकते असा कयास आहे.
 
डेव्हिड मालन यंदाच्या आयपीएल लिलावातील सर्वात महागड्या परदेशी खेळाडू ठरण्याची शक्यता आहे. आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत कोणावर सर्वाधिक बोली लागली असेल तर तो पॅट कमिन्स नावाचा खेळाडू आहे. त्या यादीत आता डेव्हिडचं नाव जाण्याची शक्यता आहे. सध्या दुसर्‍या क्रमांकावर बेन स्टॉक्सचे नाव आहे. बेन स्टॉकचा 14.5 कोटींनी लिलाव करण्यात आला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डेव्हिड त्यांचं रेकॉर्ड तोडू शकतो. त्याने इंग्लंडकडून 19 टी-20 इंटरनॅशनल सामन्यांमध्ये 150 स्ट्राइकरेटसोबत 855 धावा काढल्या होत्या. टी 20मध्ये त्याच्या नावावर एक शतक आणि 9 अर्धशतकांचा समावेश आहे. तर टी 20 सामन्यांच्या रॅकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावरचा फलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. 


डेव्हिड मालन अत्यंत आक्रमक फलंदाजी करण्यात माहिर आहे. एकूण टी -20 क्रिकेटमध्ये डेव्हिड मालनच्या 6000 पेक्षा जास्त धावा आहेत. अलीकडेच डेव्हिड मालनने बिग बॅश लीगच्या 10 सामन्यात 265 धावा केल्या. यावेळी त्याने सर्वाधिक 75 धावा केल्या आहेत. आरबी संघाकडून या खेळाडूवर बोली लावू शकतं. या संघाला डेव्हिड त्यांच्याकडे असणं महत्त्वाचं वाटत असल्यानं RBC संघात घेतलं जाण्याची शक्यता आहे.