दुबई: कोलकाता विरुद्ध चेन्नई सामना आज आहे. कॅप्टन कूल धोनी विरुद्ध इयोन मॉर्गन आमने सामने येणार आहेत. कोलकाता संघाला चॅम्पियनशिप मिळवण्यासाठी धोनीच्या संघाला पराभूत करणं गरजेचं ठरणार आहे. चेन्नईकडून ऋतुराज गायकवाड, शार्दुल ठाकूर गेम चेंजर ठरू शकतात. तर कोलकाता संघाकडे देखील तोडीस तोड खेळाडू आहेत. महाअंतिम सामन्यात कोण जिंकणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टॉस कोणी जिंकला


कोलकाता संघाने टॉस जिंकला आहे. तर पहिल्यांदा चेन्नई संघाला फलंदाजी करायची आहे. कोलकाता संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. चेन्नईच्या फलंदाजांना कोलकाताचे बॉलर कसे रोखणार याकडे सर्वांच्या नजरा आहे. 


कोलकाता संघाकडून अंतिम सामन्यासाठी आंद्रे सरेलला संधी देण्यात आली नाही. वरुण चक्रवर्ती आणि शाकीब अल हसन अंतिम सामन्यात खेळणार आहेत. चेन्नई संघाने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. या महाअंतिम सामन्यात आता कोण जिंकणार याकडे सर्वांच्या नजरा आहेत.



चेन्नई संघाचे प्लेइंग इलेव्हन


ऋतुराज गायकवाड, फाफ डु प्लेसिस, अंबाती रायडू, रॉबिन उथप्पा, महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), मोईन अली, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, दीपक चाहर, जोश हेजलवूड, ड्वेन ब्राव्हो


कोलकाता संघाचे प्लेइंग इलेव्हन


शुबमन गिल, व्यंकटेश अय्यर, नितीश राणा, दिनेश कार्तिक, राहुल त्रिपाठी, इयोन मॉर्गन, वरुण चक्रवर्ती, सुनील नरेन, शाकीब अल हसन, वरूण चक्रवर्ती, शिवम मावी, लॉकी फर्ग्युसन