मुंबई: सर्वात मोठी स्पर्धा आणि खेळाडूंची चांदी होण्याचा एकमेव मार्ग म्हणजे IPL स्पर्धा. यामधूम दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा खेळाडू आणि संघाला फायदा होत असतो. यंदा 9 एप्रिल ते 30 दरम्यान IPLचे सामने खेळवले जाणार आहेत. एका अहवालानुसार 7 वर्षांत IPL ला तब्बल 26300 कोटी रुपयांचा मोठा फायदा झाल्याचं समोर आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ग्लोबल वॅल्यूएशन आणि कॉर्पोरेशन फायनान्स ऍडवरटाइज कंपनी Duff and Phelps यांनी दिलेल्या अहवालानुसार 6 वर्षांत पहिल्यांदाच ब्रॅण्ड IPLला मोठं नुकसान झालं आहे. 2020 मध्ये त्याचं मूल्य 3.6 टक्क्यांनी घसरलं असून 45800 कोटींवर आलं होतं. 


कोरोना आणि लॉकडाऊनचा मोठा फटका IPLला देखील बसला होता. इतकं सगळं असूनही संघ आणि त्यातील खेळाडू त्यांचा खर्च याशिवाय इतर सर्व गोष्टी सांभाळून IPL आपला आर्थिक फायदा कसा काढतं? IPLच्या लिलावामध्ये यंदा जवळपास 16 कोटींपर्यंत बोली लावण्यात आली होती.


7 वर्षांत IPLसाठी किती आणि कसा झाला फायदा 
2014 मध्ये 19500 कोटी रुपये, 2015 21,300 कोटी रुपये, 2016 सालामध्ये 27500 कोटी रुपये, 2017 रोजी 34400 कोटी रुपये ही वाढ 2014 तुलनेत सर्वाधिक मानली जाते तर 2018 ते 2020 मध्ये जवळपास 45, 800 कोटी रुपयांपर्यंत भरभक्कम फायद्यामध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळतं. 


2014च्या तुलनेत विचार करायचा झाला तर 19500 वरून 2020 मध्ये 45800 पर्यंत IPL ला मोठा फायदा झाला आहे. या आकड्यांमधील फरक काढला तर जवळपास 26,300 कोटी रुपये हा फायदा IPL झाल्याचं समजतं असं Duff & Phelps यांच्या अहवालातून सांगण्यात आलं आहे. 


क्रिकेट आणि राजकारणात काहीही होऊ शकतं; पाहा कसा आऊट झाला, व्हिडीओ व्हायरल


2008 मध्ये सर्वात पहिल्यांदा IPLची सुरुवात झाली. त्यानंतर हळूहळू सगळं बदलत गेलं. केवळ खेळ या व्यतिरिक्त व्यवसाय, मनोरंजन आणि खेळ यांना एकाच प्लॅटफॉर्मवर आणण्याची संकल्पना ललित मोदी यांची होती. त्यासाठी या लीगच्या माध्यमातून केवळ भारतच नाही तर जगभरातील क्रिकेटपटू, व्यवसायिक आणि मनोरंजनाची साधनं एकाच प्लॅटफॉर्मवर जोडण्यात आली. 


खासगी कंपन्यांना क्रिकेट फ्रंचायची खरेदी कऱण्यासाठी IPLकडून प्रोत्साहन दिलं जातं. त्यामध्ये मोठी गुंतवणूक केली जाते. याशिवाय अनेक मोठ्या कंपन्या या खेळामध्ये आपले पैसे गुंतवत असतात. अगदी खेळाडूंच्या जर्सीपासून ते ट्रॉफीच्या नावापर्यंत, खेळाच्या मैदानातील बोर्डपासून ते तिथल्या व्यवस्थेपर्यंत अनेक वेगवेगळ्या गुंतवणूक करत असतात.


सर्वाधिक क्रिकेट पाहणाऱ्यांची संख्या भारतात असल्यामुळे तिथे गुंतवणूक करण्याचा ओढा व्यवसायिकांचा सर्वाधिक आहे. याशिवाय BCCI ब्रॉडकास्ट आणि ऑनलाइन स्ट्रिमिंगच्या माध्यमातून IPLला मोठा फायदा मिळत असतो. त्यामध्ये त्यांची फी कापली जाऊन IPLच्या टीमला उर्वरित फायदा वाटला जात असतो. हा फायदा टीमच्या रँकिंगवर अवलंबून आहे कोणाला किती मिळणार.


World Test Championship Ind vs Nz: अंतिम सामन्याचं ठिकाण बदललं


याशिवाय तिकीट विक्रीतून आणि तिथे येणाऱ्या छोट्या व्यवसायिकांकडून देखील मोठा फायदा होत असतो. याशिवाय ब्रॅण्ड स्पॉन्सरशिप हा देखील IPLमधील सर्वात मोठा भाग आहे जो पैसे मिळवून देतो. 


फ्रानचायजी देण्यापलिकडे ब्रॅण्ड लोको, टायटल स्पॉन्सर, जर्सी स्पॉन्सर, स्टेडियमच्या बाऊंड्री स्पॉन्सरचे, ब्रॅण्ड प्रमोशन इत्यादी गोष्टींमधून देखील मोठी कमाई होत असते. याशिवाय जिंकणाऱ्याला दिलेली रक्कम ही संघ आणि त्याचा मालक मिळून वाटून घेत असतात. याशिवाय फूड स्टॉल आणि थर्ड पार्टी आधारीत असलेल्या गोष्टींसाठी IPL वेगळे पैसे आकारत असते.