एंटीगा: आतापर्यंत तुम्ही रन आऊट, कॅच आऊट किंवा सरळ बोल्ड आऊट झाल्याचं पाहिलं असेल यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकार आऊट झाल्याचे व्हिडीओ पाहिले असतील मात्र अजब पद्धतीनं फलंदाज आऊट झाल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. आपण असं कधी आऊट होऊ याचा स्वप्नातही या फलंदाजानं कदाचित विचारही केला नसेल.
वेस्ट इंडीज विरुद्ध श्रीलंका यांच्यात एंटीगामध्ये सामना सुरू आहे. पहिल्या वन डे सामन्यादरम्यान मोठा वाद निर्माण झाला. श्रीलंकाचा फलंदाज दानुष्का गुनाथिलका अत्यंत विवादात्मक पद्धतीनं आऊट झाल्यामुळे आता क्रिकेट विश्वात मोठी खळबळ उडाली आहे.
नेमका काय आहे प्रकार?
श्रीलंका संघाच्या गोलंदाजानं 22 व्या ओवर दरम्यान बॉल टाकला. त्यावर दानुष्कानं फलंदाजी केली. बॉल जिथल्या तिथंच टप्पा पडला आणि दानुष्का जिथं फलंदाजीला उभा होता तिथपर्यंत घरंगळत गेला. त्यावेळी दानुष्का धावा काढण्यासाठी पुढे जाण्यासाठी निघालेला असताना पुन्हा मागे परतावं लागलं. क्रिजवर परतत असताना त्याच्या पायात बॉल आला आणि त्यामुळे तो आऊट झाल्याचा दावा श्रीलंका संघानं केला.
This rare dismissal has sparked outrage. Surely it wasn't deliberate!
MORE: https://t.co/roxIfLJm8E
@windiescricket pic.twitter.com/CRcYmk2l08
— Fox Cricket (@FoxCricket) March 11, 2021
Danushka Gunathilaka was given out for this pic.twitter.com/Vc6YIo6dCi
— Arjun (@ArjunNamboo) March 10, 2021
आऊट की नॉटआऊट! दानुष्का गुनाथिलका सापडला वादात दानुष्कानं जाणीवपूर्वक चेंडू अडवल्याचा दावा श्रीलंका संघानं केला आहे. त्यानंतर थर्ड अंपायरनं दिलेल्या निकालात दानुष्का आऊट झाल्याचं सांगण्यात आलं.
हा संपूर्ण प्रकार घडला तेव्हा पोलार्डने अंपायरला फील्डच्या ऑब्स्ट्रक्टिंगबद्दल तक्रार केली आणि त्यानंतर तिसऱ्या अंपायरला या वादात पडावं लागलं. तिसऱ्या अंपायरनं निर्णय नीट दिला नाही असा दावाही केल्यानं हा वाद वाढल्याचं बघायला मिळत आहे. गुनाथिलाकाने जाणीवपूर्वक बॉल थांबविण्याचा प्रयत्न केला नाही. सोशल मीडियावर संपूर्ण घटनेचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.