चेन्नई :  मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने मंगळवारी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध खेळल्या गेलेल्या आयपीएल सामन्यात एक लाजीरवाना रेकॅार्ड आपल्या नावे केला आहे. हा रेकॅार्ड कोणत्याही गोलंदाजाला आपल्या नावावर करण्याची इच्छा होणार नाही. बुमराह आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक नो बॅाल देणारा गोलंदाज ठरला आहे. या प्रकरणात बुमराहने श्रीसंतला मागे सोडत हा रेकॉर्ड केला आहे. श्रीसंतच्या नावे आयपीएलमध्ये 23 नो बॅाल आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंटरनॅशनल मॅच असो किंवा आयपीएल बुमराह नेहमीच आपल्या शानदार गोलंदाजीने हारत आलेल्या मॅच ला जिंकवले आहे. तो एक महात्वाचा आणि अनुभवी खेळाडू आहे. त्यामुळेच त्याला इंटरनॅशनल मॅच किंवा आयपीएलमध्ये 19 व्या म्हणजेच महत्वाच्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करायला उतरवतात. मंगळवारी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध खेळल्या गेलेल्या आयपीएल सामन्यात नेहमी प्रमाणेच बुमराहने 19 ओव्हर टाकली. त्यामध्ये त्याने 2 नो बॅाल टाकले ज्यामुळे दिल्लीच्या टीमला 2 बॅाल आणि 4 अतिरिक्त रन्स मिळले आणि बुमराहच्या चुकीमुळे मुंबईने मॅच गमावली. परंतु यामुळे बुमराहच्या नावावर आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक 25 नो बॅाल फेकण्याचा रेकॅार्ड झाला आहे. या मॅचमध्ये जसप्रीत बुमराहला एकच विकेट मिळाला आहे.


21 नो बॅाल अमित मिश्राच्या नावे


याशिवाय दिल्लीच्या टीममधील अमित मिश्राच्या नावे 21 नो बॅाल टाकल्याची नोंद आहे. आयपीएलमध्ये इशांत शर्माने ही 21 नो बॅाल टाकले आहेत. तर उमेश यादवने 19 नो बॅाल टाकले आहेत. अनुभवी लेगस्पिनर अमित मिश्राच्या फिरकीने आणि दिल्ली कॅपिटल्सच्या शानदार बॅटिंगमुळे दिल्लीने मुंबई इंडियन्सचा 6 विकेट्सने पराभव केला आहे.


मिश्रामुळे दिल्ली जिंकली


मुंबईने उभ्या केलेल्या 138 लक्षाचा पाठलाग करत दिल्लीतील सलामीवीर शिखर धवन (45) आणि स्टीव्ह स्मिथ (33) च्या डावामुळे 19.1 ओव्हरमध्ये 4 विकेट्सवर 138 धावा फटकावून दिल्ली कॅपिटल्स मॅच जिंकली. मुंबईची टीम मिश्राच्या फिरकीसमोर (24 धावांत 4 विकेट) 9 विकेटमध्ये 137 धावा करू शकला.