मुंबई: आयपीएलचे सामने एकीकडे रंगात येत आहेत. या दरम्यान स्टार खेळाडू आयपीएलमधून बाहेर गेल्यानं काहीशी क्रिकेट प्रेमींची निराशा देखील झाली आहे. हैदराबाद संघातून डेव्हिड वॉर्नर आयपीएल खेळणार नाही. इतकच नाही तर आता त्याच्या पाठोपाठ आणखी एका भारतीय क्रिकेटपटूचं करियर धोक्यात आल्याची चर्चा आहे. आधी टीम इंडियातून बाहेर पडला आणि आता आयपीएलच्या उर्वरित सामन्यातही स्थान मिळणार नसल्याची चर्चा आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

IPL 2021 चा दुसऱ्या टप्प्यातील सामने UAE मध्ये खेळले जात आहेत. IPL मध्ये अनेक खेळाडू आहेत जे आपल्या देशाच्या संघातून काढून टाकल्यानंतर आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करून पुनरागमन करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण टीम इंडियासाठी खेळणारा एक अनुभवी क्रिकेटपटू देखील आहे जो संघाबाहेर राहिल्यानंतर खराब कामगिरीमुळे आता त्याच्या आयपीएल संघातून बाहेर पडण्याची वेळ आली आहे. 


सनरायझर्स हैदराबादकडून खेळणारा केदार जाधव सध्या त्याच्या कारकिर्दीतील सर्वात वाईट फॉर्ममध्ये आहे. जाधव बऱ्याच काळापासून टीम इंडियासाठी खेळलेला नाही. केदार जाधवने गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये टीम इंडियासाठी शेवटचा सामना खेळला होता. त्याच्या खराब फॉर्ममुळे त्याला टीम इंडियात पुन्हा जागा मिळणं कठीण झालं आहे. 


केदारची कामगिरी विशेष चांगली नसल्याने टीम इंडियापाठोपाठ आता आयपीएलमध्ये हैदराबाद संघातून त्याला संधी दिली जाणार नसल्याची सूत्रांकडून माहिती मिळत आहे. याशिवाय हैदराबाद संघ आता प्ले ऑफच्या रेसमधून बाहेर गेल्यानं नव्या दमाच्या खेळाडूंना जास्त संधी देण्यार असल्याचे संकेत हैदराबाद संघाच्या कोचने दिले होते. त्यामुळे केदार जाधव या पुढच्या सामन्यात नसेल असाही कयास आहे.


केदार जाधवला त्याच्या सततच्या खराब फॉर्म नंतर आता हैदराबादमधूनही वगळण्यात आलं आहे. जाधव यांना एमएस धोनीच्या टीम सीएसकेने त्याच्या खराब कामगिरीमुळे वगळले होते. अशा परिस्थितीत आता त्याची कारकीर्द संपुष्टात येण्याचा धोका आहे.


केदार जाधवचा संघ सनरायझर्स हैदराबाद आतापर्यंत चांगली कामगिरी यंदाच्या आयपीएलमध्ये करू शकला नाही. पॉइंट टेबलवर त्या संघाकडे केवळ 4 पॉइंट्स आहेत. आयपीएल आणि टीम इंडिया दोन्हीमधील करियर संपुष्टात येणाची चिंता आता केदार जाधवला आहे. त्यामुळे केदारच्या चाहत्यांचीही चिंता वाढली आहे.