यूएई : आयपीएलच्या 14 व्या मोसमातील  41 व्या सामन्यात (IPL 2021 41th Match) कोलकाताने (KKR) दिल्लीचा (DC) 3 विकेट्सने पराभव केला. दिल्लीने कोलकाताला विजयासाठी 128 धावांचे आव्हान दिले होते.  हे आव्हान कोलकाताने 18.2 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 130 धावा केल्या. दिल्लीचा या सामन्यात पराभव झाला असला तरी कर्णधार आणि विकेटकीपर रिषभ पंतने (Rishbh Pant) विक्रमाला गवसणी घातली आहे. रिषभ यासह दिल्लीकडून अशी कामगिरी करणारा पहिलाच फलंदाज ठरला आहे. (ipl 2021 kkr vs dc captain rishbh pant overtake virender sehwag become 1st batsman who most runs for delhi) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय आहे रेकॉर्ड?


रिषभ पंतने कोलकाता विरुद्ध 39 धावांची खेळी केली. यासह त्याने दिल्लीचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागचा (Virender Sehwag) रेकॉर्ड ब्रेक केला आहे. यासह पंत दिल्लीकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. याआधी दिल्लीकडून सर्वाधिक धावांचा विक्रम सेहवागच्या नावे होता. रिषभ पंतने सेहवागच्या तुलनेत 6 सामन्यांआधी दिल्लीकडून सर्वाधिक धावा करण्याचा कारनामा केला आहे.


अशी आहे आकडेवारी


सेहवागने आयपीएलमध्ये दिल्ली आणि पंजाब अशा 2 संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. सेहवागने एकूण आयपीएल कारकिर्दीतील 104 सामन्यात 2 हजार 728 धावा केल्या आहेत. सेहवाग 2008 ते 2013 या दरम्यान दिल्लीकडून खेळला होता. यादरम्यान त्याने 86 सामन्यातील 85 डावांमध्ये 17 अर्धशतकांच्या मदतीने 2 हजार 382 धावा केल्या. 


पंतची आयपीएल कारकिर्द 


पंतने आयपीएलच्या 79 सामन्यांमध्ये 148.36 च्या स्ट्राईक रेट आणि 35.67 सरासरीने 1 शतक आणि 14 अर्धशतकांसह 2 हजार 390 धावा केल्या आहेत. पंतची आयपीएलमधील128 ही सर्वोच्च धावसंख्या आहे. 


यशस्वी कर्णधार


आयपीएलच्या 14 व्या मोसमाआधी दिल्लीचा नियमित कर्णधार श्रेयस अय्यरला दुखापत झाली. ती दुखापत रिषभच्या पथ्यावर पडली. पंतला नेतृत्वाची संधी देण्यात आली. पंत बॅटिंग आणि विकेटकीपिंगसह कॅप्टन्सीची जबाबदारी चोखपणे पार पाडतोय.