मुंबई: राजस्थान रॉयल्स संघाने कोलकाता संघावर 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. शनिवारी झालेल्या या सामन्यात मोठी दुर्घटना होता होता थोडक्यात निभावलं आहे. राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजीदरम्यान क्रिझवर जोसभाई फलंदाजी करत होता. त्यावेळी मोठी दुर्घटना होता होता टळली आहे. मात्र जोसभाईला दुखापत झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजस्थानच्या फलंदाजी दरम्यान जोसभाई म्हणजेस जोस बटलर क्रिझवर होता. त्यावेळी कोलकाताकडून पॅट कमिन्स गोलंदाजी करत होता. दुसऱ्या ओव्हरदरम्यान त्याने पाचवा बॉस बाऊन्सर टाकला. हा बाऊन्सर इतका घातक होता की तो थेट जोसच्या हेल्मेटवर जाऊन आदळला. 




जोस बटलच्या गालावर थोडी दुखापत झाली आहे. तरी देखील जोसने मैदान त्यावेळी सोडलं नाही. 5 धावा करून जोस तंबुत परतला. राजस्थान रॉयल्स संघाने लक्ष्याचा पाठलाग करत 6 विकेट्सनं कोलकाता संघावर विजय मिळवला. ख्रिस मॉरिसनं आपल्या तुफान गोलंदाजीनं 4 विकेट्स घेतल्या. तर डेव्हिड मिलर आणि संजू सॅमसने चांगली खेळी केली. त्यामुळे यंदाच्या हंगामातील राजस्थानच्या हा दुसरा विजय आहे. 


नुकत्याच झालेल्या झिम्बाब्वे विरुद्ध पाकिस्तानच्या सामन्यात अशाच पद्धतीनं एक अपघात थोडक्यात टळला होता. झिम्बाब्वेच्या डावाचा 7व्या ओव्हरमध्ये अरशद इक्बाल बॉलिंग करत होता. या ओव्हरमध्ये तिसरा बॉल इक्बालने इतका धोकादायक फेकला की झिम्बाब्वेचा फलंदाज तिनशे कामुनहुकामवेचे हेल्मेटही फुटलं होतं.