मुंबई : हैदराबाद (Hyderabad) आणि कोलकाता (Kolkata) या दोन संघात खूप रोमांचक सामना झाला. या सामन्यात नीतीश राणाने (Nitish Rana)  80 धावा करून उत्तम ओव्हर खेळला. या ओव्हरला त्याने आपल्या आतापर्यंतच्या आयुष्यातील लक्षवेधी ओव्हर असल्याचं म्हटलं. नीतीश राणा गेल्या अनेक सिझनपासून शाहरूख खानच्या KKR संघातून आयपीएल खेळत आहे. 



काय आहे राणा आणि अभिनेता गोविंदाचं कनेक्शन 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


कोलकाताचा स्टार फलंदाज नीतीश राणा नात्यात गोविंदाचा जावई लागतो. द कपिल शर्मा कार्यक्रमात नीतीश राणा यांनी स्वतः याची माहिती दिली होती. सुपरस्टार गोविंदा त्याचे सासरे आहेत. 



द कपिल शर्माच्या कार्यक्रमातील अभिनेता कृष्णा अभिषेक हा गोविंदाचा भाचा आहे. त्याने या कार्यक्रमात सांगितलं होतं की, सांची मारवाह नीतीशची पत्नी आहे. आणि सांची माझी चुलत बहिण आहे. यामुळे नीतीश त्याचा भावोजी झाला. सांची ही गोविंदाची भाची आहे यावरून नीतीश राणा गोविंदाचे जावई झाले. 



साची मारवाह (Saachi Marwah) हे पेशाने इंटीरियर डिझाइनर असून या दोघांची जोडी अतिशय सुंदर आहे. 18 फेब्रुवारी 2019 मध्ये या दोघांचं लग्न झालं. 


हैदराबाद विरूद्धच्या सामन्यात 80 धावा 


KKR कडून या सामन्याची ओपनिंग करण्यासाठी नीतीश राणा (Nitish Rana) ने अतिशय सुंदर फलंदाजी केली. फक्त 56 चेंडूत 80 धावा केल्या. या दरम्यान चौके आणि 4 छक्के लगावले. अर्धशतक पूर्ण केल्यानंतर फक्त बोटातील रिंग दाखवली. असं वाटलं की, हे अर्धशतक त्याने आपल्या पत्नी सांची मारवाहला समर्पित केलं आहे. नीतीश रामाने अर्धशतक पूर्ण करण्यासाठी 37 चेंडू खेळलला. 


आयपीएल सुरू होण्या अगोदर नीतीश राणाला कोरोनाची लागण झाली होती. मात्र आता तो कोरोनामुक्त झाला असून KKR संघासाठी खेळत आहे.