मुंबई: IPLच्या सामन्यांना सुरुवात होण्यासाठी केवळ काही तास शिल्लक असतानाच आता CSKसंघात मोठा बदल करण्यात आल्याचं पाहायला मिळालं आहे. CSKचा कर्णधार असलेल्या महेंद्र सिंह धोनीनं संघात IPL सुरू होण्याआधी हा बदल केला आहे. जोश हेजलवुड या गोलंदाजाला संघामधून बाहेर करण्यात आलं आहे. तर त्याऐवजी ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जेसन बेहरेनडोर्फला संघात समाविष्ट करण्यात आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज बेहरेनडोर्फ आपल्या करियरमध्ये दुसऱ्यांदा IPL खेळणार आहे. 2019 मध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून हा खेळाडू IPL खेळला होता. त्याने ऑस्ट्रेलियाकडून 11 वन डे सामने तर 7 आंतरराष्ट्रीय टी 20 सामने खेळले आहेत. 7 टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात त्याने 16 विकेट्स घेतल्या आहेत. तर IPLमध्ये 5 सामन्यांमध्ये 5 विकेट्स घेतल्या आहेत. 


टी 20 वर्ल्ड कपसाठी तयारी करायची असल्याचं कारण देऊन जोश हेजलवुडने IPLमधून माघार घेतल्याची माहिती मिळाली आहे. बायोबबलमध्ये जाण्याआधी आपल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवायचा असल्यानं त्याने स्वत:हून माघार घेतल्यानं CSKसंघासमोर प्रश्न होता. मात्र कर्णधार महेंद्र सिंह धोनीनं हा पेच सोडवत बेहरेनडोर्फला संघात समाविष्ट करून घेतलं आहे. 


आज मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामना चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर पाहायला मिळणार आहे. तर 10 एप्रिलला चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामना खेळला जाणार आहे. या सामन्यावर सर्वांचं लक्ष असणार आहे. CSKसाठी हा बदल फायद्यात पडणार असल्याची चर्चा देखील होत आहे.