मुंबई: मुंबई इंडियन्स  विरुद्ध कोलकाता चेपॉक स्टेडियमवर झालेल्या सामन्यात रोहित शर्माच्या संघाने रोमांचक विजय मिळवला. अखेरच्या दोन ओव्हरमध्ये बाजी पलटली आणि मुंबई इंडियन्स संघाला 10 धावांनी सामन्यावर विजय मिळवण्यात यश आलं. बुमराह आणि चाहरने केलेल्या कामगिरीमुळे निसटता विजय पुन्हा खेचून आणता आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई इंडियन्स संघाला रॉयल चॅलेंजर्ससोबत झालेल्या पहिल्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र पुन्हा दमदार कम बॅक करत मुंबई इंडियन्सने विजय मिळवला आहे. यावेळी कर्णधार रोहित शर्मा पुन्हा गोलंदाजी करताना दिसला. तर गोलंदाजी करताना त्याच्या पायाला देखील दुखापत झाली. 


अखेरच्या दोन ओव्हरमध्ये बाजी पलटवून रोमांचक विजय मिळाला तरी मात्र मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा खूश नसल्याचं पाहायला मिळालं. तो नाराज असल्याची चर्चा आहे. 


रोहित म्हणाला, “शेवटच्या ओव्हरमध्ये आम्हाला सलग धावा करता आल्या नाहीत. आम्ही आणखीन धावा करणं अपेक्षित होतं. मात्र तेवढ्या धावा करता आल्या नाही.  सूर्यकुमारने भारतीय संघाबरोबर दाखविलेली लय सुरूच ठेवली आहे. तो कोणतीही भीती मनात न ठेवता चांगलं खेळतो. पण तरीही शेवटच्या दोन ओव्हरमध्ये आणखी धावा काढता आल्या असत्या असंही रोहित म्हणाला आहे. 


रोहित शर्मानं सूर्यकुमार यादवचं कौतुक देखील केलं आहे. सुर्यकुमारनं अवघड पिचवरही चांगली फलंदाजी केल्यानं त्याची पाठ रोहितनं थोपटली. सामना जिंकल्याचं श्रेय त्याने गोलंदाजांना दिलं आहे.