मुंबई: स्फोटक फलंदाज आणि युनिवर्स बॉस म्हणून प्रसिद्ध असलेल्या ख्रिस गेलचं नुकतच जमैका टू इंडिया गाणं आलं. गेल सध्या पंजाब संघाकडून IPLसाठी खेळत आहे. नुकत्याच झालेल्या मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात के एल राहुल आणि गेलनं मैदानात तुफान आपलं आणि 9 विकेट्सने विजय मिळवला. आपल्या स्फोटक फलंदाजीनं गोलंदाजांना जेरीस आणणाऱ्या गेलच्या फिटनेसच रहस्य काय आहे? असा प्रश्न नक्कीच पडल्याशिवाय राहणार नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जेव्हा गेलला आपल्या फिटनेससंदर्भात विचारण्यात आलं त्यावेळी तो म्हणाला, 'विकेट्स दरम्यान धावताना मला चांगले दिसत होते, मला तंदुरुस्त वाटत आहे. मी त्याचा आनंद घेत आहे, मी माझ्या शरीराकडे नीट लक्ष देतो. मी माझ्या शरीराला पुरेसं मालिश करतो त्यामुळे मी मुक्तपणे सामन्यादरम्यान धावपळ करू शकतो. मसाज हे माझ्या फिटनेसचं रहस्य असल्याचंही गेलनं म्हटलं आहे. 



आयपीएलच्या वेबसाईटवर अर्शदीप सिंग आणि ख्रिस गेल यांनी एकमेकांशी संवाद साधला त्यावेळी गेल म्हणाला, 'मला खूप बरं वाटतं आहे. आम्हाला हा विजय मिळवयचाच होता. गतविजेत्या चॅम्पियन्स विरूद्ध खेळणे नेहमीच अवघड असते. मुंबई इंडियन्स संघाने 4 सामने खेळले आहेत, हा विजय संघ आणि युनिव्हर्स बॉससाठी सर्वोत्कृष्ट आहे. 


पंजाबचा कर्णधार के एल राहुलने देखील ख्रिस गेलची स्तुती केली आहे. गेलने फलंदाजांच्या दृष्टीकोनातून खूप उत्तम कामगिरी देखील म्हटलं आहे. मयंक अग्रवाल, ख्रिस गेल आणि के एल राहुल या तिघांनी मिळून मुंबई इंडियन्स संघानं दिलेलं लक्ष्य पार केलं. 9 विकेट्सनं पंजाब किंग्सने दणदणीत विजय मिळवला आहे. पंजाब सध्या पॉइंट टेबलमध्ये पाचव्या स्थानावर आहे.