मुंबई: मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू नुकतच IPLमधील पहिला सामना पार पडला. अटीतटीच्या लढतीमध्ये RCB संघ 2 विकेट्स राखून जिंकला आहे. या सामन्यात कोहलीच्या संघातील ऑलराऊंडर खेळाडू हर्षल पटेलनं कमाल केली आहे. त्यानं केलेल्या कामगिरीनं विराट कोहलीच नाही तर क्रिकेट क्षेत्रापासून सोशल मीडियापर्यंत अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरसीबी गोलंदाजी दरम्यान हर्षल पटेलने 20 व्या ओव्हरमध्ये 4 विकेट्स घेतल्या. या ओव्हरमध्ये पहिल्या, दुसर्‍या, चौथ्या आणि सहाव्या चेंडूवर त्याने मुंबई इंडियन्सच्या 4 फलंदाजांना बाद केलं. त्याला हॅट्रीक करण्याची संधी होती मात्र थोड्याशा फरकानं हॅट्रीक हुकली पण अनोखा रेकॉर्ड पहिल्याच सामन्यात त्यानं आपल्या नावे केला आहे. 



आयपीएल 2021 (IPL 2021) च्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा बंगळुरु संघाने पराभव केला आहे. 20 व्या ओव्हरमध्ये शेवटच्या बॉलवर एक रन घेऊन 2 गडी राखत बंगळुरु संघाने विजय मिळवला. इंडियन प्रीमियर लीगच्या 14 हंगामाला आजपासून सुरुवात झाली आहे. आज दुसरा सामना चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स होणार आहे.