मुंबई: आयपीएलच्या चौदाव्या हंगामाला सुरुवात झाली आहे. आज चेन्नई सुपरकिंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स सामना रंगणार आहे. नुकताच मुंबई विरुद्ध बंगळुरू सामना पार पडला. यंदाही मुंबई इंडियन्स संघानं गेल्या 8 वर्षांची परंपरा कायम राखत पहिला सामना हातून गमवला. तर RCB संघानं अटीतटीच्या सामन्या शेवटच्या ओव्हरमध्ये निसटता विजय खेचून आणला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहित शर्मा सामन्यानंतर म्हणाला, 'पहिला सामना नाही तर चॅम्पियनशिप जिंकणे महत्वाचे आहे. पहिला सामना हा खूप चांगला सामना होता. RCBला आम्ही इतक्या सहजा सहजी जिंकू दिलं नाही. आम्ही आमच्या स्कोअरवर खूश नसलो तरी. आम्ही 20 धावा कमी केल्या हे पण तितकच खरं आहे. आम्ही काही चुका केल्या पण तसं होतच असतं. आपण त्यातून घेऊन आता पुढे जायचं. खेळपट्टीवर फलंदाजी करणे सोपे नव्हते आणि पुढील काही सामन्यांमध्ये आम्हाला त्याबद्दल विचार करणे खूप गरजेचं असल्याचं रोहित शर्मानं सांगितलं.


गेल्या 9 वर्षांमध्ये मुंबई इंडियन्स संघ एकदाही पहिला सामना जिंकू शकला नाही. अगदी मुंबई इंडियन्स संघानं 5 वेळा जरी चॅम्पियनशिप मिळवली असली तरी त्याला पहिला सामना जिंकण्यात यश आलं नाही. 2012 रोजी IPLमध्ये पहिला सामना जिंकण्यात मुंबई इंडियन्स संघाला यश आलं होतं. त्यानंतर आजपर्यंत पहिला सामना कायम पराभूत होण्याचा लाजीरवाणा विक्रम मुंबई इंडियन्स संघाचा आहे.