IPL 2021 MI vs SRH: हिटमॅन रोहित शर्माने मोडला कॅप्टन कूलचा रेकॉर्ड
हैदराबाद विरुद्ध झालेल्या सामन्यात हिटमॅन रोहित शर्मानं दोन विक्रम आपल्या नावावर केले आहेत. या विक्रमामुळे रोहित शर्माचं कौतुक होत आहे.
मुंबई: हैदराबाद विरुद्ध चेपॉकवर नुकत्याच झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला 13 धावांनी विजय मिळवण्यात यश आलं. मुंबई इंडियन्स संघाचा IPLच्या या हंगामातील झालेल्या सामन्यांमधला दुसरा विजय आहे. हैदराबाद विरुद्ध झालेल्या सामन्यात हिटमॅन रोहित शर्मानं दोन विक्रम आपल्या नावावर केले आहेत. या विक्रमामुळे रोहित शर्माचं कौतुक होत आहे.
मुंबई इंडियन्स संघ जिंकल्याचा आनंद साजरा केला जात असतानाच हिटमॅन रोहितचं त्याच्या विक्रमामुळे कौतुक होत आहे. हैदराबाद विरुद्ध झालेल्या सामन्यात रोहित शर्माने 32 धावांची खेळी करताना 2 तुफान षटकार ठोकले. या षटकारानंतर हिटमॅन IPLमधील सर्वात जास्त षटकार ठोकणार भारतीय खेळाडू असा विक्रम स्वत:च्या नावावर केला आहे. यावेळी त्याने चेन्नईचा कर्णधार कॅप्टन कूल महेंद्र सिंह धोनीलाही मागे टाकलं.
महेंद्र सिंहच्या नावावर 216 षटकारांचा विक्रम नोंदवण्यात आला होता. मात्र धोनीला मागे सोडत रोहित शर्माच्या नावावर आता 217 षटकारांचा विक्रम नोंदवण्यात आला आहे.
पहिला- (MI) हिटमॅन रोहित शर्मा- IPLमध्ये 217 षटकार
दुसरा- (CSK) कॅप्टन कूल महेंद्र सिंह धोनी IPLमध्ये 216 षटकार
तिसरा- (RCB) विराट कोहली तिसरा- IPLमध्ये 2021 षटकार
कर्णधार म्हणून रोहित शर्माने 4 हजार धावा पूर्ण केल्या आहेत.
IPLमध्ये कर्णधार म्हणून विराट कोहलीनं 6044 तर धोनीने 5872 धावा पूर्ण केल्या आहेत. त्यानंतर रोहित शर्माने 4004 धावा पूर्ण करण्याचा आणखी एक विक्रम केला आहे. या विक्रमात रोहित शर्मा चौथ्या स्थानावर आहे.
RCB- विराट कोहली- 6044
CSK- महेंद्र सिंह धोनी- 5872
KKR- (माजी कर्णधार) गौतम गंभीर- 4242
MI- रोहित शर्मा- 4004