IPL2021: `जसप्रीत बुमराहपेक्षा गोलंदाजीत मोहम्मद सिराज श्रेष्ठ`
आशीष नेहराच्या मते `हा` भारतीय फास्ट बॉलर बुमराहपेक्षाही श्रेष्ठ
मुंबई: भारतीय गोलंदाजांच्या यादीत बुमराहचं नाव नाही असं होणारच नाही. सर्वांच्या तोंडावर बुमराहचं नाव सध्या आहे. लग्नानंतर तो जेवढा चर्चेत आल्या त्याहीपेक्षा जास्त त्याच्या गोलंदाजीसाठी आणि सध्या त्याच्या IPLमधील डेथ ओव्हरमध्ये केलेल्या गोलंदाजीनं चर्चेत आहे. बुमराह कर्णधाराला निराश करत नाही अशी काहींची तर धारणा देखील असल्याचं पाहायला मिळत आहे. त्याने 11 कसोटी सामन्यात 50 विकेट्स घेणारा खेळाडू म्हणून बुमराहचं नाव घेतलं जातं.
मुंबई इंडियन्स संघाकडून खेळणाऱ्या बुमराहला थेड स्पेशलिस्ट म्हणूनही ओळखला जातो. माजी भारतीय वेगवान गोलंदाज आशीष नेहरा यांनी बुमराहबाबत मोठे विधान केलं. जसप्रीत बुमराहपेक्षाही गोलंदाजीमध्ये वरचढ मोहम्मद सिराज असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मोहम्मद सिराजकडे अधिक कौशल्य आहे असा दावा देखील त्यांनी केला आहे.
क्रिकबजने दिलेल्या एका वृत्तानुसार आशीष नेहरा म्हणाले की जसप्रीत बुमराह एक चांगला गोलंदाज आहे यामध्ये काही शंकाच नाही. पण जेव्हा विषय कौशल्य पाहण्याच्या दृष्टीनं येतो तेव्हा बुमराहपेक्षा अधिक वरचढ मोहम्मद सिराज आहे असं मला वाटतं.
'असे काही गोलंदाज आहेत जे तुम्ही टी -20 किंवा वनडेमध्ये खेळताना दिसतात ते सर्व फॉरमॅटमध्ये खेळताना दिसत नाहीत. पण सिराज प्रत्येक स्वरूपात चांगली गोलंदाजी करू शकतो. त्याच्यात कौशल्याची कोणतीही कमतरता भासत नाही. त्याच्याकडे गोलंदाजीतही विविधता आहे आणि या बाबतीत तो बुमराहपेक्षा चार पावलं पुढे आहे.
सिराज जवळ वेगानं गोलंदाजी करण्याची क्षमता आहे. इतकच नाही तर स्लो बॉल टाकण्याचंही कौशल्य त्याला अवगत आहे. नव्या चेंडूला स्विंग कसं करायचं याची उत्तम जाण त्याला आहे. फक्त त्याला स्वत:च्या फिटनेसकडे लक्ष देण्याची आणि चाणाक्षपणे विचार करण्याची गरज आहे.
आशीष नेहरा यांच्या म्हणण्यानुसार बुमराह आणि सिराज यांची तुलना कुठेच होऊ शकत नाही. दोन्ही गोलंदाजीत तरबेज आहेतच पण जेव्हा कौशल्यांचा पातळीवर विचार करायचा असेल तेव्हा सिराज हा बुमराहपेक्षा थोडासा श्रेष्ठ ठरतो.