मुंबई: IPL ची प्रतीक्षा अवघ्या काही तासांत संपणार आहे. 9 एप्रिलपासून चौदाव्या हंगामाची सुरुवात होत आहे. सर्व संघांनी कंबर कसली आहे. यंदाच्य़ा IPL वर देखील कोरोनाचं सावट असलं तरी देखील सर्व संघ काळजी घेऊन तयारी करत आहेत. चेन्नई सुपर किंग्स संघ यंदा पुन्हा एकदा चॅम्पियनशिप मिळवण्यासाठी सज्ज झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माहीच्या हेलिकॉप्टपर शॉट्सचे व्हिडीओ पाहून इतर संघांचं टेन्शन जरी वाढलं आहे. इतकच नाही तर माहीच्या संघातील 5 खेळाडू कोणत्याही क्षणी बाजी पलटवू शकतात अशी सध्याची स्थिती आहे. त्यामुळे CSKसंघाचा विजयाचा मार्ग तितकासा खडतर नसेल असा कयास व्यक्त केला जात आहे.


CSKचे 5 बेस्ट खेळाडू जे पलटवू शकतात बाजी


या वेळी चेन्नईच्या संघात सुरेश रैना, महेंद्रसिंग धोनी, ड्वेन ब्राव्हो, अंबाती रायुडू आणि इम्रान ताहिर सारख्या खेळाडूंचा समावेश आहे. या हंगामात चेन्नईने काही नवीन चेहऱ्यांनाही संधी देण्यात आली आहे. 


मोईन अलीची संघात एन्ट्री


चेन्नईने यंदा इंग्लंडचा अष्टपैलू मोईन अलीला 7 कोटी देऊन संघात घेतलं आहे. याशिवाय ऋतुराज गायकवाडला देखील संधी देण्यात आली आहे. मोईन अलीची इंग्लंड संघाकडून टी 20 सामन्यातील कामगिरी खूपच चांगली राहिली आहे. गायकवाडनं मागच्या हंगामात अर्धशतक ठोकलं होतं. त्यामुळे दोघंही यंदाच्या हंगामात संघासाठी चांगली कामगिरी करतील असा विश्वास आहे. 


डु प्लेसिस आणि मोईन अली यांच्यात कडवी लढत


फाफ डू प्लेसिसच्या रूपाने चेन्नईकडे आणखी एक फलंदाज आहे. त्यामुळे पहिल्या सामन्यासाठी मोईन अली की फाफ डुप्लेसिस कोणाची निवड केली जाणार हे पाहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 


रैना अखेरच्या वेळी 2019 मध्ये आयपीएलमध्ये खेळला होता. अलीकडेच झालेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये तो खेळला, जिथे त्याने 5 सामन्यांत 102 धावा केल्या होत्या. 


रवींद्र जडेजा आणि ब्रावो


अष्टपैलू रवींद्र जडेजा यावर्षी जानेवारीत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना जखमी झाला होता. त्यानंतर तो कोणतेच सामने खेळला नाही. सॅम क्रेन हा चेन्नई संघातील मधल्या पट्टीतील खेळाडू आहे. 


शार्दुल ठाकूरसोबत आक्रमक गोलंदाजी करण्यासाठी ब्रावो CSKच्या टीममध्ये आहे. धोनीचे हेलिकॉप्टर शॉट्स, शार्दुलची आक्रमक गोलंदाजी, मोईन अली आणि फाफ सारखे खेळाडू CSK संघाकडे असल्यामुळे विजयाचा मार्ग अधिक सोपा होईल.