मुंबई: आयपीएलमध्ये सर्वाधिक विजेतेपद पटकावणारा संघ मुंबई इंडियन्स आयपीएल 2021च्या रेसमधून शुक्रवारी बाहेर पडला आहे. या संघाने पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. यावेळी, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली हा संघ विजेतेपदाची हॅट्ट्रिक मारण्याचा प्रयत्नात होता पण तो यशस्वी होऊ शकला नाही कारण संघ आयपीएल 2021 च्या प्लेऑफमध्ये स्थान मिळवू शकला नाही. आयपीएलमध्ये गेल्या पाच वर्षांतील मुंबईची कामगिरी पाहिली तर त्यात एक विचित्र योगायोग पाहायला मिळत आहे. मुंबई इंडियन्स टीमचा 1 आणि 5 आकड्यांना संबंध दिसून आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जर आपण गेल्या पाच हंगामांवर नजर टाकली तर मुंबईच्या संघाने लीग पहिल्या स्थानावर किंवा पाचव्या स्थानावर खेळली आहे. आयपीएल 2021 मध्ये संघ पाचव्या स्थानावर आहे. मुंबई संघाने 14 सामन्यांत 7 विजय आणि 7 पराभवांसह 14 गुणांसह साखळीचा टप्पा पूर्ण केला. यात आणखी एक गोष्ट आहे की, गेल्या पाच वर्षांत जेव्हाही मुंबईने पहिल्या स्थानासह लीग स्टेज पूर्ण केला आहे, तेव्हा त्याने जेतेपद पटकावले आहे.


2020 च्या हंगामाबद्दल बोलायचे झाले तर मुंबईने दिल्ली कॅपिटल्सला हरवून पाचव्यांदा आयपीएलचे जेतेपद पटकावले. या हंगामात मुंबईने पहिल्या स्थानावर राहून लीग स्टेज संपवला. या हंगामात मुंबईने 14 सामन्यांमध्ये नऊ विजय आणि पाच पराभवांची नोंद केली.


2019 मध्ये मुंबईचा संघ विजेतेपद पटकावण्यात यशस्वी झाला. या हंगामातही मुंबईने लीग स्टेज पहिल्या स्थानावर पूर्ण केला आहे. 2019 मध्ये मुंबईने नऊ विजय आणि पाच पराभवासह 18 गुण जमा केले होते.


2018 मध्ये, टीम प्लेऑफसाठी पात्र होऊ शकली नाही आणि या हंगामात देखील टीम पाचव्या स्थानावर राहिली. या हंगामात मुंबईने 14 सामन्यांपैकी सहा सामने जिंकले, तर त्यांना आठ सामने गमावले. त्यांनी 12 गुणांसह साखळीचा टप्पा संपवला.


याआधी 2017 मध्ये मुंबईने आयपीएलचे तिसरे जेतेपद पटकावले होते. या हंगामात मुंबईने लीग स्टेज पहिल्या स्थानावर पूर्ण केले. 14 सामन्यांमध्ये रोहितच्या संघाने 10 सामने जिंकले आणि चारमध्ये पराभूत झाले. हा संघ 20 गुणांसह प्लेऑफमध्ये पोहोचला होता.


2016 मध्ये, हा संघ पाचव्या स्थानावर राहिला आणि प्लेऑफसाठी पात्र होऊ शकला नाही. या हंगामात, मुंबईने 14 पैकी सात सामने जिंकले, सात गमावले आणि 14 गुणांसह साखळीचा टप्पा पूर्ण केला.