मुंबई: IPLऐन रंगात आलं असताना चुरस वाढली असताना आता हैदराबाद संघासाठी क्रिकेट विश्वातून मोठी धक्कादायक बातमी येत आहे. श्रीलंकेचा स्पिनगर आणि हैदराबाद संघाचा बॉलिंग कोच मुथैया मुरलीधरन यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुथैया मुरलीधरन IPLच्या चौदाव्या हंगामात सनरायझर्स हैदराबाद संघासाठी बॉलिंग कोच म्हणून काम करत होते. त्यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 


मुरलीधरन यांना रविवारी संध्याकाळी अपोलो रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. त्यांच्या चाचण्या करण्यात आल्या. हार्टमध्ये ब्लॉकेज असल्याची माहिती मिळाली. त्यांच्यावर चेन्नईमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. 17 एप्रिल रोजी झालेल्या हैदराबादच्या सामन्यादरम्यान ते मैदानावर उपस्थित होते. त्या दिवशी त्यांचा वाढदिवस देखील होता. 



जगातील सर्वोत्तम गोलंदाजांमध्ये मुरलीधरन यांचं नाव आहे. श्रीलंकेकडून त्यांनी 133 कसोटी सामने, 350 वन डे सामने खेळले आहेत. त्यांनी कसोटी सामन्यात 800 तर वन डे सामन्यामध्ये 534 विकेट्स घेतल्या आहेत. 


यंदाच्या IPLमध्ये हैदराबाद संघाला आपलं खातं उघडण्याची संधी अद्याप मिळाली नाही. तीनवेळा हैदराबाद संघ पराभूत झाला आहे. त्यातच आता बॉलिंग कोच मुरलीधरन यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असल्यानं संघाला मोठा धक्का बसला आहे. सर्वजण ते लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करत आहेत.