मुंबई: IPLचे सामने स्थगित झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज बऱ्याच कालावधीनंतर घरी पोहोचला आहे. त्याला सुखरुप घरी आलेलं पाहून त्याच्या गर्लफ्रेंडनं खूप घट्ट मिठी मारली आणि दोघंही भावुक झाले. एप्रिल महिन्यानंतर कमिन्सन घरी परतला आहे. भारतात 4 मे रोजी IPLचे सामने स्थगित झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना थेट घरी जाण्याची परवानगी तिथल्या सरकारकडून नव्हती. त्यामुळे मालदीवरून ऑस्ट्रेलिया असा प्रवास करावा लागला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट अँकर क्लॉय अमांडा बेली यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये पॅट कमिन्स क्वारंटाइनमधून बाहेर पडला आणि तो आपल्या गर्लफ्रेंडला भेटला. त्याने आपल्या गर्लफ्रेंडला मिठी मारली आणि किस्स देखील केलं. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 



पॅट कमिन्सची गर्लफ्रेंड सध्या प्रेग्नंट असून तिने बेबी बंपचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. पॅटच्या घरात लवकरच एक गोड बातमी येणार आहे. बेकी आपल्या बेबी बंपचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. पॅट IPL 2021मध्ये कोलकाता संघाकडून खेळत आहे. 


IPL 2021चे उर्वरित 31 सामने रिशेड्युल करण्यात आले आहेत. सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान हे सामने UAEमध्ये होणार असल्याची माहिती मिळाली आहे. सामन्यांचं शेड्युल अद्याप समोर आलं नाही.