यूएई : आयपीएलच्या 14 व्या मोसमातील (IPL 2021) 53 व्या सामन्यात पंजाब किंग्सने (PBKS) चेन्नई सुपर किंग्सवर (CSK) दणदणीत विजय मिळवला. चेन्नईने विजयासाठी दिलेल्या 135 धावांचे आव्हान पंजाबने 13 ओव्हर्समध्ये  4 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. पंजाबचा कर्णधार केएल राहुल (PBKS Captain K L Rahul) या विजयाचा शिल्पकार ठरला. (ipl 2021 pbks vs csk bowler Deepak Chahar proposed to his partner Jaya Bhardwaj after the match)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केएलने नाबाद 98* धावांची खेळी केली. केएलने 42 चेंडूत 7 फोर आणि 8 खणखणीत सिक्सच्या मदतीने शानदार खेळी साकरली. तर इतर फलंदाजांनी छोटेखानी खेळी करुन केएलला चांगली साथ दिली. 


चेन्नईकडून शार्दुल ठाकूरने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर दीपक चाहरने (Deepak Chahar) 1 विकेट घेतली. खऱ्या अर्थाने दीपकने फलंदाजाच्या विकेटसह एका तरुणीची विकेट घेतली. 



सामन्यानंतर दीपकने भर मैदानात (स्टँडमध्ये) गुडघ्यावर बसून तरुणीला प्रपोज केलं. त्यानंतर रिंग घातली. त्यानंतर दीपकनेही त्या तरुणीला रिंग घातली. यानंतर दोघांनी एकमेकांना घट्ट मीठी मारली. उपस्थितांनी या जोडीला चिअरअप केलं. हा सर्व प्रकाराचा रोमॅन्टिक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. काही जणांनुसार ही तरुणी दीपकची प्रेयसी असल्याचंही म्हंटलं जातंय.


दरम्यान क्रिकेटच्या सामन्यादरम्यान किंवा मैदानात प्रेयसीला प्रपोज करण्याचा किंवा अंगठी घालण्याचा ही काही पहिली वेळ नाही. याआधी इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यात झालेल्या तिसऱ्या टी 20 सामन्यादरम्यान एका क्रिकेटप्रेमीने एका तरुणीला अशाच प्रकारे प्रपोज केला होता. हा सामना 20 जुलैला मँचेस्टरमध्ये खेळवण्यात आला होता.   


कोण आहे जया भारद्वाज?


जया भारद्वाज अभिनेता विशाल भारद्वाजची बहीण आहे. दीपक अनेक दिवसांपासून जयाला डेट करत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. पण आज जे घडलं त्या नंतर या सर्व बातम्यांना पूर्णविराम मिळाला आहे.