दुबई: धोनी आपल्या शांत स्वभावासाठी जगप्रसिद्ध आहे. विनाकारण धोनी कुणावर चिडत नाही ही धोनीची ओळख आहे. संतापलेला धोनी देखील तितक्याच शांतपद्धतीने परिस्थिती हाताळतो. मात्र पंजाब विरुद्ध झालेल्या सामन्यात धोनीचा राग अनवार झाला आणि जे कॅमेऱ्यात कैद झालं त्यामुळे धोनी सोशल मीडियावर खूप चर्चेत आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंजाब विरुद्ध चेन्नई झालेल्या सामन्यात पंजाब संघाने दणदणीत विजय मिळवला. एम एस धोनी जेव्हा बॅटिंगसाठी मैदानात उतरला तेव्हा एका बॉल दरम्यान त्याचा राग अनावर झाला. हा राग काढण्यासाठी धोनी काहीतरी पुटपुटला. ते कॅमेऱ्यात कैद झालं आणि हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओची सोशल मीडियावर उलट-सूलट चर्चा सुरू झाली. 


पंजाब विरुद्ध टॉस हरल्यानंतर चेन्नईने पहिली फलंदाजी केली. यावेळी अंबाती रायडू आऊट झाल्यानंतर धोनी सहाव्या क्रमांकावर मैदानात उतरला. मात्र जास्त धावा करण्यात त्याला यश आलं नाही. पंजाबच्या रवी बिश्नोईने माहीला क्लीन बोल्ड केलं. त्यावेळी धोनीचा राग अनावर झाला. 


धोनीने ओठ हलवून काहीतरी पुटपुटले. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक युझर्सनी बेन स्टोक्सची का आठवण काढली असा प्रश्न उपस्थित करत आहे. तर दुसरीकडे काही युझर्सनी धोनीकडून ही अपेक्षा नाही असंही म्हटलं आहे. धोनीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.