मुंबई: चेन्नईनंतर पंजाब संघाला विराटसेनेच्या विजयाच्या रथ रोखण्यात यश आलं आहे. के एल राहुलचं शतक हुकलं असलं तरी त्याच्या तुफान खेळीमुळे पंजाब संघाने 34 धावांनी बंगळुरू संघावर विजय मिळवला आहे. या विजयात मोठा वाटा अर्धात के एल राहुलचा आहे. बंगळुरू संघाला आधी चेन्नई संघाकडू तर नंतर पंजाबकडून पराभव स्वीकारावा लागला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंजाब संघाने बंगळुरूसमोर 34 धावांनी विजय मिळवत बल्ले बल्ले केलं. तर बंगळुरू संघाचा दुसरा पराभव असला तरी पॉइंट टेबलमध्ये सध्या तिसऱ्या स्थानावर आहे. पंजाब संघ नाणेफेकमध्ये हरल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरला. त्यांची सुरुवात चांगली झाली नाही. मात्र के एल राहुल क्रिझवर टीकून राहिला. ख्रिस गेलनं 45 चेंडूमध्ये 80 धावा केल्या. त्याने 24 चेंडूमध्ये 6 चौकार आणि 2 षटकार ठोकले. 


गेल आऊट झाल्यानंतर फलंदाजीतील मधली फळी तितकीशी विशेष कामगिरी करू शकली नाही. पूरन पुन्हा एकदा शून्यवर बाद झाला. दीपक हुड्डा 5, शाहरूख खान शून्यवर आऊट होऊन तंबुत परतला. हरप्रीत बराडने नाबाद 25 धावा करत सामन्यावर पकड मजूबत केली. के एल राहुलने 57 बॉलमध्ये 91 धावा केल्या. 




बंगळुरू संघात विराट कोहलीनं 35, रजतने 31 आणि हर्षल पटेलनं 31 धावा केल्यचा आहेत. जेमिनसनने 16 धावांची खेळी केली. डॅनियल सॅन 3 तर शाहबाझ अहमद 8 धावा काढून तंबुत परतले. तर मॅक्सवेल शून्यवर आऊट झाल्यानं मोठी निराशा झाली. 


पंजाबच्या हरप्रीतने 3 विकेट्स घेतल्या आहेत. रवी बिश्नोईनं दोन विकेट्स घेत दोघांनी मिळून बंगळुरूचा अर्धा संघ तंबुत धाडला. चेन्नईनंतर बंगळुरूला पराभूत करण्यात पंजाब संघाला यश आलं. तर हा विराटसेनेचा दुसरा पराभव आहे.