दुबई: IPL 2021 दुसऱ्या टप्प्यातील 37 वा सामना सुरू आहे. हैदराबाद विरुद्ध पंजाब सामना मैदानात सुरू आहे. या सामन्यासाठी पंजाब संघाने 3 मोठे बदल केले आहेत. शारजाह इथे सुरू असलेल्या सामन्यात पंजाब संघाला विजय मिळवून देण्यासाठी एक खास प्लेअर संघात घेण्यात आला आहे. या खेळाडूमुळे आता हैदराबाद संघाचं टेन्शऩ वाढलं आहे. के एल राहुलने नाथन एलिसला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एलिस ऑस्ट्रेलियाचा रहिवासी आहे आणि त्याने नुकतच दणक्यात आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्याने बांगलादेशविरुद्ध पहिल्याच टी -20 सामन्यात हॅटट्रिक घेतली. हैदराबाद विरुद्धच्या सामन्यासाठी फास्ट बॉलर नाथन एलिसला संघात समाविष्ट करण्यात आलं आहे.पंजाब किंग्जच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये वेस्ट इंडिजच्या फॅबियन एलनची जागा एलिसने घेतली आहे. एलनने दुसऱ्या टप्प्यात राजस्थान विरुद्ध विशेष कामगिरी केली नव्हती.


नाथन ऑस्ट्रेलियाच्या टी 20 वर्ल्ड कपसाठी देखील राखीव खेळाडू असणार आहे. 26 वर्षांच्या एलिसने दोन आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने केलेल्या जबरदस्त कामगिरीमुळे के एल राहुलने त्याला संघात प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिलं आहे. त्याच्या कामगिरीनं पंजाबला आजचा विजय मिळवता येणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे. 



पंजाब किंग्स प्लेइंग XI: के. एल राहुल (कर्णधार आणि विकेटकीपर) , मयंक अग्रवाल, ख्रिस गेल, अॅडन मार्करम, निकोलस पूरण, दीपक हुड्डा, रवि बिश्नोई, मोहम्मद शमी, हरप्रीत बरार, अर्शदीप सिंह, नाथन एलिस.


सनराझजर्स हैदराबाद प्लेइंग XI: डेविड वॉर्नर, ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), मनीष पांडे्य, केन विलियमसन (कर्णधार) केदार जाधव, अब्दुल समद, जेसन होल्डर, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, संदीप शर्मा, खलील अहमद.