मुंबई: भारतासह जगभरात एकीकडे कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. क्रिकेट विश्वावरही कोरोनाचा धोका आहे. नुकतच दिल्ली संघातील स्टार खेळाडूनं कुटुंबीयांना कोव्हिड झाल्यामुळे IPLमधून ब्रेक घेतल्याचं जाहीर केलं तर दुसरीकडे विदेशी खेळाडूंनी वाढत्या कोरोनाच्या भीतीमुळे आपल्या देशात परत जाण्याचा निर्णय घेतला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आतापर्यंत तीन खेळाडूंनी IPL सोडून आपल्या घरी जाण्याचा निर्णय घेतल्याचं समोर आलं आहे. रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघानी ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे. RCB संघातील खेळाडू एडम झम्पा आणि केन रिचर्डसन ऑस्ट्रेलियात परत गेले आहेत. तर दुसरीकडे राजस्थान संघातील एका खेळाडूनं अचानक IPLमधून माघार घेण्याच निर्णय घेतला आहे. 



वाढता कोरोना आणि सुरू असलेल्या IPLसामन्यांवर आता सोशल मीडियावर टीका होत असल्याचं पाहायला मिळत आहे. याच वादात ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्राने देखील उडी घेतली होती. खेळाडू जास्त काळ बायो बबलमध्ये राहू शकत नाहीत. तर कोरोना काळातही आयपीएल सुरू ठेवल्यानं त्याने टीका देखील केली होती. 


वाढता कोरोना आणि विदेशी खेळाडूंनी घेतलेली माघार या संदर्भात आता बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी IPLबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. IPLलीग सुरूच राहणार असल्याचे बीसीसीआयने स्पष्टीकरण दिलं आहे. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 'आयपीएल सुरू राहील. जर कोणाला जायचे असेल तर ते जाऊ शकतात. आरसीबीने निवेदनात म्हटले आहे की एडम झाम्पा आणि केन रिचर्डसन वैयक्तिक कारणास्तव मायदेशी परतले आहेत आणि उर्वरित सामने खेळणार नाहीत असं सांगितलं आहे.