पंजाब किंग्सने कोलकाता नाईट रायडर्सला धूळ चारली, रोमांचक विजय
आयपीएल 2021च्या (IPL 2021) 45 व्या सामन्यात, केएल राहुलची (KL Rahul) टीम पंजाब किंग्सने (Punjab Kings) रोमांचक विजय मिळवला.
मुंबई : आयपीएल 2021च्या (IPL 2021) 45 व्या सामन्यात, केएल राहुलची (KL Rahul) टीम पंजाब किंग्सने (Punjab Kings) रोमांचक विजय मिळवला. इयोन मॉर्गनच्या (Eoin Morgan) कोलकाता नाईट रायडर्सला (Kolkata Knight Riders) पराभवाचा मोठा सामना करावा लागला. (KKR vs PBKS Highlights: Punjab Beat Kolkata By 5 Wickets In A Last-Over )
पंजाब किंग्जसाठी रोमांचक विजय
पंजाब किंग्सने (Punjab Kings)19.3 षटकांत 5 गडी गमावून 168 धावा केल्या आणि सामना 5 गडी राखून जिंकला. केएल राहुलने सर्वाधिक 67 धावा केल्या आणि आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली. जेव्हा शाहरुख खान (Shahrukh Khan) याने शेवटचा चेंडू मारला, तेव्हा चेंडू राहुल त्रिपाठी याच्या हाताला लागून सीमारेषा ओलांडून गेला आणि पंचानी षटकार दिला. या षटकारासह सामना संपला. त्यानंतर पंजाबने विजयाचा जल्लोष साजरा केला.
केकेआरने केल्या 165 धावा
इयोन मॉर्गनची टीम कोलकाता नाईट रायडर्सने प्रथम खेळताना 20 षटकांत 7 गडी गमावून 165 धावा केल्या आणि यासह पंजाब किंग्सला 166 धावांचे टार्गेट दिले होते. मात्र, पंजाप किंग्जने हे टार्गेट सहट पार केले आणि कोलकाता नाईट रायडर्सल पराभूत केले.
टॉसचा बॉस
पंजाब किंग्जचा कर्णधार केएल राहुल याने नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्सला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. राहुलचा हा निर्णय त्याच्या बाजूने लागला.
IPL गुणतालिकेत कोण पुढे आहे?
आयपीएल 2021 मध्ये पंजाब किंग्सने आतापर्यंत 12 सामने खेळले आहेत, ज्यात त्यांनी फक्त 5 सामने जिंकले आहेत आणि ते गुणतालिकेत 5 व्या क्रमांकावर पोहोचले आहेत. दुसरीकडे, कोलकाता नाईट रायडर्सने 12 पैकी 5 सामने जिंकले आहेत आणि ते गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आहेत.
पंजाब किंग्ज प्लेइंग इलेव्हन : केएल राहुल (कर्णधार आणि यष्टीरक्षक), मयंक अग्रवाल, एडन मार्कराम, निकोलस पूरन, दीपक हुडा, फॅबिन एलन, रवी बिष्णोई, शाहरुख खान, नॅथन एलिस, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह.
कोलकाता नाईट रायडर्स संभाव्य प्लेइंग इलेव्हन: इऑन मॉर्गन (कर्णधार), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), नितीश राणा, राहुल त्रिपाठी, शुभमन गिल, टीम शेफर्ट, टीम साउथी, वरुण चक्रवर्ती, सुनील नारायण, शिवम मावी, व्यंकटेश अय्यर.