दुबई : आयपीएलचा 14 वा मोसमात (IPL 2021)  बंगळुरुच्या हर्षल पटेल (Harshal Patel) या वेगवान गोलंदाजाने आतापर्यंत धमाकेदार कामगिरी केलीय. हर्षलने 26 सप्टेंबरला मुंबई विरुद्ध झालेल्या सामन्यात हॅटट्रिक घेतली. यासह हर्षल बंगळुरुकडून हॅटट्रिक घेणारा तिसरा फलंदाज ठरला. यानंतर आता हर्षलने राजस्थान विरुद्धच्या सामन्यात (Rajasthan vs Bangalore 43rd Match) किर्तीमान केला आहे. (IPL 2021 Rajsthan vs banglore harshal patel overtake to yuzvendra chahal and become 1st bowler who take most wickets for rcb in an ipl edition) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हर्षल बंगळुरुकडून अशी कामगिरी करणारा पहिलाच गोलंदाज ठरला आहे. हर्षलने राजस्थान विरुद्धच्या सामन्यात 4 ओव्हरमध्ये 34 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे हर्षलने राजस्थानच्या डावातील 20 व्या ओव्हरमध्येच हे 3 विकेट्स मिळवल्या. यासह हर्षल युझवेंद्र चहलचा रेकॉर्ड ब्रेक करत बंगळुरुकडून एका मोसमात सर्वाधिक विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज ठरला. याआधी युझवेंद्र चहलने 2015 मध्ये बंगळुरुकडून 23 विकेट्स घेतल्या होत्या.


हर्षलने या मोसमातील 11सामन्यात आतापर्यंत 8.57 च्या इकॉनॉमीने आणि 9.30 च्या स्ट्राईक रेटने  26 विकेट्स घेतल्या आहेत. याचाच अर्थ हर्षल प्रत्येक 9 चेंडूनंतर विकेट घेतो. या मोसमात हर्षलने एकदा 4 तर एकदा 5 विकेट्स घेतल्या आहेत.


ड्वेन ब्राव्होच्या रेकॉर्डवर डोळा


आयपीएलच्या एका मोसमात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड हा ड्वेन ब्राव्होच्या नावावर आहे. ड्वेन ब्राव्होने 2013 मध्ये चेन्नईकडून खेळताना 32 विकेट्स घेण्याचा कारनामा केला होता. या रेकॉर्डपासून हर्षल आता अवघ्या 7 विकेट्स दूर आहे.
 
बंगळुरुला या मोसमातील साखळी फेरीतील आणखी 3 सामने खेळायचे आहेत. तसेच जर बंगळुरुने प्ले ऑफमध्ये धडक मारली, तर आणखी मॅच खेळण्याची संधी मिळेल. त्यामुळे हर्षल आता ब्राव्होचा रेकॉर्ड ब्रेक करणार का, याकडे क्रिकेट चाहचत्यांचं लक्ष असणार आहे.  


बंगळुरुला विजयासाठी 150 धावांचे आव्हान 


बंगळुरुने टॉस जिंकून राजस्थानला पहिले बॅटिंगसाठी भाग पाडले. राजस्थानने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 149 धावा केल्या. त्यामुळे बंगळुरुला विजयासाठी 150 धावांचे आव्हान मिळाले आहे. राजस्थानकडून एव्हीन लेव्हीसने सर्वाधिक 58 धावा केल्या. तर यशस्वी जयस्वालने 31 धावांची खेळी केली. तर बंगळुरुकडून हर्षल पटेलने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. 


अशी आहे बंगळुरुची टीम :  विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, एस भरत (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, एबी डीव्हीलियर्स, शाहबाज अहमद, डॅनियल क्रिस्टीयन, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, जॉर्ज गार्टन आणि युझवेंद्र चहल.


राजस्थान रॉयल्सची प्लेइंग इलेव्हन : यशस्वी जयसवाल, एविन लुईस, संजू सॅमसन (कर्णधार), लियाम लिविंगस्टोन, महिपाल लोमरोर, रियान पराग, ख्रिस मॉरिस, मुस्ताफिजुर रहमान, चेतन सकारिया, राहुल तेवतिया आणि कार्तिक त्यागी.