वॅक्सीनमुळे माझ्या बाबांचा जीव वाचला! आर अश्विननं केला खुलासा
आर अश्विनने सर्वांना कोरोनाची लस घेण्याचं आवाहन देखील केलं आहे. एक लसीमुळे आज त्याच्या वडिलांचे प्राण वाचले आहेत.
मुंबई: देशात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये अनेक खेळाडुंच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. पीयूष चहर आणि चेतन साकरिया या दोन्ही खेळाडूच्या वडिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आर अश्विनचं कुटुंब कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्याने IPLमधून ब्रेक घेतला होता. त्याच्या वडिलांची तब्येत बिघडल्याने रुग्णालयात दाखल करावं लागलं.
आर अश्विननं आपल्या वडिलांना मृत्यूच्या दाढेतून ओढून पुन्हा माघारी आणलं आहे. इतकच नाही तर कोरोना विरुद्धच्या या लढ्यामध्ये त्याला कोरोना लसीने देखील खूप मोठी साथ दिल्याचं त्याने भावुक होत सांगितलं. आहे.
आर अश्विन म्हणाला की, 'गेल्या काही दिवसांचा काळ आमच्यासाठी खूप कठीण होता. सुरुवातीला तिने मला याची कल्पना दिली नव्हती कारण मी IPLमध्ये सामने खेळत होतो. मात्र मुलांना ज्या वेळी ताप आला त्यावेळी तिने ही गोष्ट माझ्या कानावर घातली. कुटुंबात कोरोनाने शिरकाव केल्याने मी IPLमधून ब्रेक घेतला. '
माझ्या वडिलांची तब्येत 5 दिवस ठीक नव्हती. त्यानंतक त्यांची ऑक्सिजन लेव्हल 85 होती. त्यांना श्वास घेण्यासाठी त्रास होत होता. रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून देखील त्यांची ऑक्सिजन पातळी सुधारत नव्हती. माझ्या वडिलांनी लसीचे दोन डोस घेतले होते. त्यामुळे अशा परिस्थितीवर मात ते करू शकले असंही आर अश्विननं सांगितलं आहे.
कोरोनातून वाचण्यासाठी लसीकरण हा एकमेव उपया आहे. त्याने सर्वांनी लस घ्यावी असं आवाहन देखील आर अश्विननं केलं आहे. माझ्या वडिलांना कोरोनाची लस घेतल्यामुळे आज त्याचा फायदा झाला आणि ते कोरोनाशी लढू शकले असंही यावेळी अश्विननं सांगितलं.