IPL 2021: RCBचा खेळाडू सामना बुडवून घरी देणार `या` कामाला प्राधान्य
IPL2021 : टीम मॅनेजमेंटने देखील या खेळाडूला काम करण्याची परवानगी दिली आहे.
मुंबई: सहा शहांमध्ये पुढच्या दोन आठवड्यात IPL 2021 14 व्या हंगामाची सुरुवात होणार आहे. 8 संघ आणि शहारांमध्ये काँटे की टक्कर असलेले सामने खेळले जाणार आहेत. या सामन्याआधी RCB संघामधून एक मोठी बातमी येत आहे.
RCB संघाचा चॅम्पियन गोलंदाज मात्र पहिल्या सामन्यात दिसणार नाही. IPL मधील पहिला सामना बुडवून तो महत्त्वाचं काम करणार असल्याची माहिती मिळाली आहे. कर्णधार विराट कोहलीची टीम रॉयल चॅलैंजर्स बंगळुरूमधील विदेशी खेळाडू लवकरच बोहल्यावर चढणार आहे. IPLचा पहिला सामना बुडवून तो लग्न करणार आहे. या खेळाडूला RCB ने यंदाही आपल्या संघात स्थान दिलं आहे. मात्र सुरुवातीच्या सामन्यामध्ये हा खेळाडू
ऑस्ट्रेलियन लेगस्पिनर अॅडम झाम्पा या मोसमातील पहिल्या सामन्यासाठी खेळणार नाही. मागील मोसमात केवळ आरसीबीचा भाग बनलेल्या झाम्पाला या मोसमात RCBने आपल्या संघात कायम ठेवले होते. जगातील अव्वल टी -२० गोलंदाजांपैकी झम्पा एक आहे.
हा खेळाडू लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. त्यामुळे तो येणारा IPL सामना खेळू शकणार नाही. महत्त्वाचं म्हणजे त्यासाठी व्यवस्थापनाकडून देखील क्रिकेटपटूला परवानगी मिळाली आहे. क्रिकेटचे संचालक माईक हेसन यांनी याबाबत माहिती दिली आहे.