IPL 2021 : 20 चेंडू 102 धावा... 21 वर्षां `हा` युवा खेळाडू मैदानात तुफान आणणार
कोहलीसोबत मैदानात तुफान आणण्यासाठी 21 वर्षांचा हा युवा खेळाडू सज्ज झाला आहे.
मुंबई: IPL 2021च्या 14व्या हंगामाला 9 एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. 9 एप्रिल ते 30 मे पर्यंत IPLचे सामने खेळवले जाणार आहेत. या IPLपूर्वी RCBचा कर्णधार विराट कोहलीला 7 दिवस क्वारंटाइन व्हावं लागणार आहे. तर कोहलीसोबत मैदानात तुफान आणण्यासाठी 21 वर्षांचा हा युवा खेळाडू सज्ज झाला आहे.
न्यूझीलंडचा फलंदाज फिन एलनने आपल्या फलंदाजीने मैदानात दहशत पसरवली आहे. फिनला बांगलादेश विरुद्ध टी -२० मालिकेत खेळण्याची संधी मिळाली. पहिल्या सामन्यात तो फारसा कामगिरी करू शकला नाही. पण दुसऱ्या सामन्यात त्याने जी खेळी केली ते पाहून भल्याभल्यांची तोंडच बंद झाली.
त्याच्या फलंदाजीची विलक्षण आक्रमकता पाहून RCBसंघाची कॉलर ताठ झाली. फिनचा हा पराक्रमही विराट कोहलीसाठी खूप महत्वाचा ठरणार आहे. याचं कारण म्हणजे फिन एलन हा विराट कोहलीच्या संघाकडून RCBमधून IPL खेळणार आहे.
बांग्लादेश विरुद्ध फिन एलननं दुसऱ्या टी 20 सामन्यात 10 चेंडूत 17 धावा केल्या. त्यामध्ये त्याने 2 चौकार आणि एक षटकार लगावला. तर त्याने याआधी 50 ओव्हरच्या झालेल्या घरच्या मैदानावर शतकही झळकवलं होतं. त्यावेळी 59 चेंडूमध्ये 128 धावांचा पल्ला गाठला होता. 11 षटकार आणि 9 चौकार असा सामना त्याने खेळला होता. त्याची ही दमदार कामगिरी विराट कोहलीसाठी मोलाची ठरणार आहे. IPLमध्ये त्याचा फलंदाजीमधील आक्रमकपणा RCBसाठी फायदाचा ठरणार आहे.