IPL 2021 RCB vs DC: जिंकता जिंकता हरले! बंगळुरूचा दिल्लीवर 1 रनने रोमांचक विजय
पॉइंट टेबलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू पहिल्या स्थानावर आहे. दुसऱ्या स्थानावर चेन्नई सुपरकिंग्स तिसऱ्या स्थानावर दिल्ली आणि चौथ्या स्थानावर मुंबई टीम आहे.
मुंबई: तीन वर्षात असं पहिल्यांदाच घडलं जिंकता जिंकता हरले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध झालेल्या सामन्यात दिल्लीला केवळ एक रननं पराभव स्वीकारावा लागला. विजयाच्या अगदी जवळ पोहोचूनही सामना जिंकता आला नाही त्यामुळे दिल्ली संघाची मोठी निराशा झाली. तर दुसरीकडे विराट कोहलीची टीम पुन्हा एकदा आनंद साजरा करत आहे.
बंगळुरू संघाने 1 रनने दिल्ली कॅपिटल्सवर रोमांचक विजय मिळवला आहे. दिल्लीने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. कोहलीने 12 पड्डिकलने 17, पटीदारने 31 तर मॅक्सवेलनं 25 धावांची खेळी केली. ए बी डिव्हिलियर्सने मैदानात येत तुफान आणलं. एकावर एक बॉल टोलवत त्याने 42 बॉलमध्ये 75 धावांची खेळी केली. आपले 5 गडी गमावून बंगळुरूने 171 धावा केल्या तर दिल्लीसाठी 172 धावांचं लक्ष्य़ ठेवलं.
लक्ष्याचा पाठलाग करताना ऋषभ पंतने 58 धावा केल्या. शिमरोनने 53 आणि पृथ्वी शॉने 21 धावांची खेळी केली आहे. शिखर धवन 6 धावा करून तंबुत परतला तर स्टिव स्मिथची बॅटची 4 धावांच्या पुढे चालू शकली नाही. मोहम्मद सिराज आणि हर्षल पटेल आणि ए बी डिव्हिलियर्सने मिळून दिल्लीचे 4 गडी बाद केले. त्यांना 20 ओव्हरमध्ये 170 धावांचं लक्ष्य गाठण्यात यश मिळालं आहे.
बंगळुरूचा ग्लॅन मॅक्सवेल ऑरेंज कॅपमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. तर दिल्लीचा शिखर धवन पहिल्या स्थानावर आहे. त्याने 265 धावा केल्या आहेत. पर्पल कॅपमध्ये पहिल्यापासून हर्षल पटेलनं बाजी मारली आहे. आतापर्यंत त्याने 17 विकेट्स घेतल्या आहेत. त्याला टफ फाईट देण्यासाठी आवेश खान आहे. त्याने 12 विकेट्स घेतल्या आहेत.
पॉइंट टेबलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू पहिल्या स्थानावर आहे. दुसऱ्या स्थानावर चेन्नई सुपरकिंग्स तिसऱ्या स्थानावर दिल्ली आणि चौथ्या स्थानावर मुंबई टीम आहे.