IPL 2021: मॅक्सवेलला मागे टाकत गब्बरनं मिळवली ऑरेंज कॅप
शिखर धवननं 49 बॉलमध्ये 92 धावा केल्या. त्यानंतर आऊट झाल्यानं शिखर धवन तंबुत परतला. दिल्ली संघ 6 विकेट्सने जिंकल्यानं पॉईंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर पोहोचले.
मुंबई: ऑस्ट्रेलियाचा स्टार ऑलराऊंडर आणि RCBसंघातील खेळाडू ग्लॅन मॅक्सवेलला मागे टाकत दिल्ली कॅपिटल्स संघातील गब्बरने ऑरेंज कॅप मिळवली आहे. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्स झालेल्या सामन्यात गब्बर शिखर धवननं दमदार खेळी करत विराट कोहली आणि रवी शास्त्रींना दाखवून दिलं.
धमाकेदार फॉर्ममध्ये IPLच्या या हंगामात शिखर धवन खेळताना दिसला. नुकत्याच पंजाब विरुद्ध झालेल्या सामन्यात धवनचं शतक 8 धावांनी हुकलं तरी संघाला विजय मिळवून देण्यात त्याचा सिंहाचा वाटा आहे.
शिखर धवननं 49 बॉलमध्ये 92 धावा केल्या. त्यानंतर आऊट झाल्यानं शिखर धवन तंबुत परतला. दिल्ली संघ 6 विकेट्सने जिंकल्यानं पॉईंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर पोहोचले.
आतापर्यंत झालेल्या सामन्यात ऑरेंज कॅप ग्लॅन मॅक्सवेलकडे होती मात्र त्याला मागे टाकत गब्बर शिखर धवनकडे ही कॅप आली आहे. पहिल्या स्थानावर शिखर धवन आहे.
शिखर धवन (DC) - 186
ग्लॅन मॅक्सवेल (RCB)- 176
के एल राहुल (PBKS)- 157
नितीश राणा (KKR)- 155
ए बी डिव्हिलियर्स (RCB)- 125
दिल्ली संघाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यामुळे पंजाब संघाला पहिली फलंदाजी करावी लागली. पंजाब संघात के एल राहुलने 61 तर मयंग अग्रवालने 67 धावांची खेळी केली. त्यानंतर दीपक हुड्डाने 22, शाहरुख खानने 15 धावा केल्या. त्यांनी पंजाब संघासमोर 196 धावांचं लक्ष्य ठेवलं.